Yogesh Kadams On Saif Ali Khan Attacked: अभिनेता सैफ अली खानवर वांद्रे इथल्या राहत्या घरात चाकू हल्ला झाल्याची माहिती मिळतेय. चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या अज्ञाताने चाकू हल्ला केल्याची माहिती मिळतेय. सध्या सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सैफवर चाकू हल्ला केल्यानंतर आरोपी पसार झालाय. सैफ अली खानच्या इमारतीतून बाहेर पडतांना मुख्य गेटनं बाहेर न पडता शेजारील इमारतीच्या आवारात त्यानं उडी मारली आणि सेंट तेरेसा हायस्कुल च्या समोरील रस्क्यावरुन बाहेर पळाला.शेजारील इमारतीचे सिसीटीव्ही फुटेज गोळा केले आहेत. दरम्यान गृहराज्यमंत्री (शहर) योगेश कदम यांनी यावर महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले योगेश कदम? जाणून घेऊया.
सैफ अली खान हल्ला प्रकरणी धार्मिक रंग देऊ नये, असे आवाहन योगेश कदम यांनी केले. प्राथमिक माहितीनुसार, चोरीच्या दृष्टीकोनातून हा हल्ला केला असावा. हत्येच्या दृष्टीकोनातून चोर घरात शिरला नसावा. झटापटीतून हल्ला झालाय, असे योगेश कदम यांनी म्हटले आहे.
मुंबई सुरक्षित नाही, असा आरोप होतोय. पण भीतीचे वातावरण तयार करु नका. बॉलिवूडकरांनी घाबरण्याचे कारण नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्यात तुम्ही सुरक्षित आहेत. सलमान खानला येणाऱ्या धमक्या, बाबा सिद्धीकी यांची हत्या या घटनेचा या हल्ल्याशी संबंध जोडू नका, असे योगेश कदम यांनी म्हटलंय.
कुठल्याही गॅंग चा अँगल नाहीय... जी काही बाबा सिद्धकी, सलमान खान यांच्याबाबत घटना झाली त्या घटनेचा आणि या घटनेचा काही संबंध नाही.चोरीचा प्रकार हा आहे असे दिसून येते.चोर घराच्या मागच्या भिंती वरून चढला होता.चार माळ्याची बिल्डिंग आहे त्या चार माळ्याच्या बिल्डिंग मध्ये सीसीटीव्ही कमी होते.एका सीसीटीव्हीतून त्याचा चेहरा समोर आलेला आहे..तो फोटो आमच्या इन्फर्मन यांना पाठवलेला आहे... लवकर असायला पकडले जाईल पण यात कुठलाही गँग्स अँगल नाही, असे योगेश कदम म्हणाले.
फक्त सैफ अली खानचा आडनाव खान आहे म्हणून राजकारण काही लोक करत आहेत. याची मला की वेदर... महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला सत्तेच्या बाकावरून फेकले आहे. आता तुम्ही विरोधी भागावर आहात पण काहीही बरळत राहाल.याला आम्ही अजिबात खपू देणार नाही.जितेंद्र आव्हाड यांनी इतकं लक्षात घ्यावं. या घटनेला सामाजिक आणि राजकीय रंग देणे म्हणजे त्यांची राजकारणातील परिपक्वता किती आहे हे लक्षात येतं, असे ते म्हणाले.
त्या बिल्डिंगमध्ये पोलीस डिपार्टमेंटची कोणतीही सिक्युरिटी नव्हती... जी काही होती ती प्रायव्हेट सिक्युरिटी होती. मुळात सैफ अली खान यांचा घर चार माळ्याचा आहे आणि तिथे सीसीटीव्ही नव्हते.तो डेटा जो मिळाला त्यात उशीर झालेला आहे... एका सीसीटीव्हीतून आरोपीचा फोटो मिळाला आहे... म्हणून याला कुठलाही धार्मिक आणि यांचा रंग देणं चुकीचा राहील. प्राथमिक माहितीनुसार फक्त आणि फक्त चोरीचा अँगल यात दिसून येतोय, असेही त्यांनी सांगितले.
अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या घरी चोरानं हल्ला केल्यानंतर क्राईम ब्रान्चची टीम सैफच्या घरी दाखल झालीये.. या हल्ल्याचा तपास मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रान्चकडे सोपवण्यात आलाय... क्राईम ब्रान्चची टीम सैफच्या वांद्रे येथील घरी दाखल झाली असून पुढील तपास सुरु आहे. चाकू हल्ल्याची चौकशी सुरू असताना पोलिसांनी त्याचा स्निफर डॉग आणला अभिनेत्याच अपार्टमेंट असलेल्या ''सतगुरु शरण'' या इमारतीच्या बाहेर स्निफर डॉग दिसतोय...आता याच्यामदतीने पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.