Hero Destini 125 : भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादन कंपनी अशी ओळख असणाऱ्या हीरो मोटोकॉर्पकडून वर्षाच्या सुरुवातीलाच एक कमाल स्कूटर लाँच केली आहे. विशेष म्हणजे महिला वर्गाला ही स्कूटर जरा जास्तच आवडणार आहे. कारण ठरतंय ते म्हणजे या स्कूटरचा नवा लूक.
हीरोनं नुकताच त्यांच्या Hero Destini 125 स्कूटरला नव्या रुपात सादर केलं आहे. स्कूटरच्या या नव्या मॉडेलमध्ये कंपनीनं काही कॉस्मेटीक बदल केले असून, आकर्षक डिझाईनसह ती 80450 रुपये (एक्स शोरुम) इतक्या किमतीत विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहे. माहितीनुसार ही स्कूटर अर्थात हीरो डेस्टिनी 125 तीन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आली आहे.
VX, ZX आणि ZX+ हेच ते व्हेरिएंट असून, या स्कूटरची प्रारंभिक किंमत 80450 रुपये असून, अनुक्रमे 89300 आणि टॉप मॉडेलसाठी 90300 रुपये (एक्स शोरुम) इतकी किंमत मोजावी लागणार आहे. एच शेप एलईडी डीआरएल असणाऱ्या या स्कूटरला स्टायलिश लूक देण्यात आला असून, मेटल फ्रंट फेंडर, साईड पॅन, डायमंड कट अलॉय व्हील देण्यात आले आहेत. ही स्कूटर इटरनल व्हाईट, रिगल ब्लॅक, ग्रूवी रेड, मजेंटा, कॉस्मिक ब्लू अशा रंगांमध्ये उपलब्ध आहे.
या स्कूटरमध्ये 125 सिसी सिंगल सिलिंडर इंजिनची क्षमता असून, त्यातून 9 बीएचपी पॉवर आणि 10.4 न्यूटन मीटर पॉवर इतका टॉर्क जनरेट होतो. ही स्कूटर एक लीटर पेट्रोलमध्ये 59 किमी इतकं मायलेज देते असा दावा कंपनी करत असल्यामुळंसुद्धा ती चर्चेत आहे. नेहमीप्रमाणेच या स्कूटरला डिजिटल अॅनालॉग स्पीडोमीटर, ब्लूटूथ कनेक्टीव्हिटी असणारा डिजिटल डिस्प्ले, रिअल टाईम मायलेज अपडेट अशा सुविधा दिल्या जात आहेत.
भारतीय रस्त्यांना केंद्रस्थानी ठेवतच ही स्कूटर डिझाईन करण्यात आली असून, तिचे फिचरलही हीच बाब अधोरेखित करतात. त्यामुळं ही स्कूटर खरंच नेमकी किती कमाल आहे हे पाहण्यासाठी तिची टेस्ट राईड आणि थेट ती खरेदी करण्यासाठी आता गर्दी होणार ही बाब नाकारता येत नाही.