सचिन तेंडुलकर आणि आदित्य ठाकरेंनी केली बॅन्ड स्टॅन्ड परिसरात साफसफाई

युवासेना प्रमुख यांच्या सोबतीने क्रिकेटर सचिन तेंडुलकर याने आज वांद्रे येथील बॅन्ड स्टॅन्ड भागाची साफसफाई केली. 

Updated: Sep 26, 2017, 11:17 AM IST
सचिन तेंडुलकर आणि आदित्य ठाकरेंनी केली बॅन्ड स्टॅन्ड परिसरात साफसफाई  title=

मुंबई : युवासेना प्रमुख यांच्या सोबतीने क्रिकेटर सचिन तेंडुलकर याने आज वांद्रे येथील बॅन्ड स्टॅन्ड भागाची साफसफाई केली. 

ज्या भूमीला आपणा 'धरणीमाता' म्हणतो त्याच भूमीवर लोकं इतका कचरा टाकतात. हे पाहून वाईट वाटतं ' अशी भावना सचिन तेंडुलकर याने व्यक्त केली आहे. तसेच लोकांनी बाहेर पडल्यावर कचराकुंड्याचा वापर करावा. त्यामध्ये कचरा टाकण्याचे आव्हान केले आहे. कचरा साफ करण्याला आपण 'कचरेवाला' म्हणतो. पण वास्तवात आपण कचरा करतो तो तर सफाईवाला आहे. असे सांगत आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहनही सचिनने केले आहे.

 

सचिन तेंडुलकर सोबत त्याचा मुलगा अर्जुन आणि आदित्य ठाकरे यांनीदेखील बॅन्ड स्टॅन्ड परिसराची साफसफाई केली. 

ट्विटरची मदत घेत सचिन तेंडुलकरने नागरिकांना त्यांच्या मित्रांसोबत एखादा परिसर ठरवून तेथे साफसफाई करण्याचे आवाहन केले आहे.