आरक्षण: मुख्यमंत्र्यांसोबतची धनगर समाजाच्या नेत्यांची बैठक निष्फळ

धनगर समाजाची पंपरंगात वेशभूषा धारण करून आंदोलक  मोर्च्यात सहभागी झाले होते.

Updated: Aug 28, 2018, 09:53 AM IST
आरक्षण: मुख्यमंत्र्यांसोबतची धनगर समाजाच्या नेत्यांची बैठक निष्फळ title=

मुंबई: धनगर समाजाच्या प्रश्नावर आयोजित करण्यात आलेली मुख्यमंत्री आणि धनगर समाजाच्या नेत्यांची बैठक निष्फळ ठरलीय. या बैठकीनंतर धनगर समाजाचे नेते असमाधानी असल्याचे समोर आलंय. मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत जुनंच आश्वासन दिल्याचा आरोप त्यांनी केलाय.

सरकारला इशारा

दरम्यान, धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन देऊनही अंमलबजावणी न केल्याच्या निषेधार्थ धनगर समाज संघर्ष समितीने यवतमाळमध्ये शेळ्या मेंढ्या घेऊन मोर्चा काढला. येत्या ८ सप्टेंबरपर्यंत धनगर आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यास आणखी तीव्र लढा उभारला जाईल. त्याला सरकार जबाबदार राहिल असा इशारा आंदोलकांनी दिला.

आरक्षणाच्या मागणीसाठी ढोल बजाव आंदोल

धनगर समाजाच्या वतीने राज्यभर आरक्षणाच्या मागणीसाठी ढोल बजाव आंदोलन आयोजित करण्यात आले होते. हिंगोली जिल्ह्यात  हे आंदोलन करण्यात आलं. औंढा नागनाथ शहरात ढोल वाजवून मोर्चा काढण्यात आला. धनगर समाजाची पंपरंगात वेशभूषा धारण करून आंदोलक या मोर्च्यात सहभागी झाले होते.