समीर वानखेडे यांच्या अटकेबाबत मोठी अपडेट; शाहरूखसोबतच्या Whatsapp चॅटमध्ये धक्कादायक माहिती

 समीर वानखेडेंना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. वानखेडे यांना 22 मेपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. सीबीआयला तपासात सहकार्य करण्याचे आदेश देखील कोर्टाने दिले आहेत. 

वनिता कांबळे | Updated: May 19, 2023, 05:21 PM IST
समीर वानखेडे यांच्या अटकेबाबत मोठी अपडेट; शाहरूखसोबतच्या Whatsapp चॅटमध्ये धक्कादायक माहिती  title=

Sameer Wankhede CBI Raid:  एनसीबीचे (NCB) माजी झोनल डिरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या  अटकेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. समीर वानखेडे यांना कोर्टाने दिलासा आहे. कोर्टाने वानखेडे यांना पुढील सुनावणी पर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. समीर वानखेडे याचिकेवरील सुनावणी 22 मेपर्यंत तहकुब करण्यात आली आहे. तसेच CBIला देखील जबाब नोंदविण्याच्या सूचना कोर्टाने  दिल्या आहेत.  वानखेडे यांनी CBI ला तपासात सहकार्य करावं असे आदेश देखील कोर्टाने दिले आहेत.  आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात वानखेडेंनी शाहरूख खानकडं खंडणी मागितल्याचा गुन्हा सीबीआयनं दाखल केला आहे. याप्रकरणी वानखेडेंची चौकशी होणार आहे

एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती.  आर्यन खान ड्रग्सप्रकरणात समीर वानखेडेंनी रिट याचिका दाखल केली होती. सीबीआयने वानखेडेंविरोधात एफआयआर दाखल केलाय. मात्र, दिल्ली हायकोर्टाने वानखेडेंना 22 मेपर्यंत चौकशीपासून दिलासा दिला.  जच्या सुनावणीत वानखेडे यांना दिलासा मिळाला आहे. 

व्हॉट्सअप चॅट समोर आल्याची धक्कादायक माहिती

समीर वानखेडे आणि शाहरूखमध्ये अनेकदा व्हॉट्सअप चॅट समोर आल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. शाहरूखनं आपल्यासोबत चॅट केलं असा दावा समीर वानखेडे यांच्या याचिकेत करण्यात आलाय. या चॅटमध्ये शाहरूखनं आपल्या मुलासाठी वानखेडेंना विनंती केल्याचं समोर आलंय. आर्यनवर दया दाखव, त्याची काळजी घे अशी विनंती शाहरूखनं समीर वानखेडेंकडे केल्याचा दावाही वानखेडेंकडून करण्यात आलाय.  ड्रग्ज प्रकरणात ज्यावेळी आर्यन खान अटकेत होता तेव्हाचं हे चॅट असल्याचा दावा करण्यात येतोय. 

आर्यन खान ड्रग्स प्रकरणी दोन वरिष्ठ अधिका-यांमध्येच जुंपली

आर्यन खान ड्रग्स प्रकरणी दोन वरिष्ठ अधिका-यांमध्येच जुंपली होती. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि तत्कालीन उपमहानिर्देशक ज्ञानेश्वर सिंग यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. आर्यन खानचं नाव एफआयआरमध्ये ऐनवेळी दाखल करण्यात आलं असं अॅफिडेव्हिट ज्ञानेश्वर सिंग यांनी दिले. तर,  जी काही कारवाई झाली ती वरिष्ठांना माहिती होती.  हे माझे तत्कालीन वरिष्ठ ज्ञानेश्वर सिंग यांचं षडयंत्र असल्याचा आरोप समीर वानखेडेंनी केला. याप्रकरणातले पुरावे मुंबई हायकोर्टात सादर करणार असल्याचा दावाही समीर वानखेडेंनी केला आहे.