पोपट, मैना, मोर कुणीही मेलेले नाही, सगळे जिवंत आहेत; अजित पवार यांची पोपटावरुन टीका

पोपट मेल्याचं उद्धव ठाकरेंना कुणीतरी सांगण्याची गरज असल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावाल. तसेच  राजीनामा नाट्य टीआरपीसाठी होते असं म्हणत फडणवीस यांनी पवारांवरही निशाणा साधला.

वनिता कांबळे | Updated: May 19, 2023, 04:36 PM IST
पोपट, मैना, मोर कुणीही मेलेले नाही, सगळे जिवंत आहेत; अजित पवार यांची पोपटावरुन टीका title=

Maharashtra Politics:  राज्याच्या राजकारणात पोपटाची एंट्री झाली आणि राज्याच्या राजकारणात किलबिलाट सुरु झाला. राज्यातील नेते एकमेकांवर पोपटावरुन टीका करत आहेत. पोपटावरुन महविकास आगाडीचे नेते आणि भाजप नेत्यांमध्ये जुंपली आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील आता पोपटावरुन टीका केली आहे.  पोपट मेला नाही, मैना मेली नाही, मोर मेला नाही. सगळे जिवंत आहे. कोण कुठं मेलय दाखवा असं म्हणत अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगवला आहे. 

महाराष्ट्राच्या राजकारणात  पोपटाची एंट्री कशी झाली?  

मिठू मिठू करणा-या पोपटाची महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री झालीय. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर 16 आमदारांच्या अपात्रतेवरुन मविआ आक्रमक झालीय आणि याच मुद्द्यावरुन मविआ विरुद्ध भाजप-शिंदे गटात वार प्रहार पाहायला मिळतायत. सुप्रीम कोर्टाच्या निकालावरून फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. पोपट मेल्याचं उद्धव ठाकरेंना कुणीतरी सांगण्याची गरज आहे असं फडणवीस म्हणाले. यावर राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय. निवडणुका घ्या मग पोपट कुणाचा मेलाय ते जनता दाखवेल असं राऊतांनी म्हटलं आहे.  मविआ-भाजपत पोपटावरुन सामना सुरु असताना पोपट मेलाय की नाही हे तुम्ही झूमध्ये जाऊन पाहा अशी मिश्किल प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिली.

अजित पवार  यांची पोपटावरुन टीका

पोपटवरुन सुरु असलेल्या या वादात अजित पवार यांनी देखील उडी घेतली आहे.  पोपट, मैना, मोर कुणीही मेलेले नाही, सगळे जिवंत आहेत.   कोण कुठं मेलय दाखवा असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.  पोपट मेलाय म्हणण्यापेक्षा शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या. महागाई बेरोजगारी चे प्रश्न आहेत असे देखील ते म्हणाले.

त्रंब्यकेश्वरची धुप दाखवण्याची पंरपरा 100 वर्षांची

त्रंब्यकेश्वरची धुप दाखवण्याची पंरपरा 100 वर्षांची आहे. समाजात तेढ निर्माण केली जात आहे. हे सर्व ताबडतोब थांबले पाहिजे. काही लोकांनी गोमूत्र शिंपडले. कोणी काय शिंपडावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. काही राजकीय पक्षांचे लोक वातावरण अधिक कलुषित कसे होईल याचा प्रयत्न करतायत. त्रंब्यकेश्वरच्या आमदारांनी सांगातले की ही 100 वर्षांपासूनची परंपरा आहे.