Satyajit Tambe : कुणी लिहिली तांबेंच्या उमेदवारीची स्क्रिप्ट? काँग्रेसला कुणी बनवलं 'मामा'? फडवीसांनी गेम फिरवला

 काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म जोडला नसल्याने त्यांची उमेदवारी अपक्ष जाहीर करण्यात आलीय. विशेष म्हणजे आज राबवण्यात आलेल्या छाननी प्रक्रियेत भाजपच्या चार उमेदवारांनी अर्ज भरूनही त्यांना एबी फॉर्म देण्यात आलेला नाही, हे समोर आलंय. त्यामुळे या खेळीमागे भाजपची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याची चर्चा सध्या नगर जिल्ह्यात रंगली आहे. 

Updated: Jan 13, 2023, 06:15 PM IST
Satyajit Tambe : कुणी लिहिली तांबेंच्या उमेदवारीची स्क्रिप्ट? काँग्रेसला कुणी बनवलं 'मामा'? फडवीसांनी गेम फिरवला title=

Maharashtra Politics: नाशिक पदवीधर मतदार संघाच्या ( Nashik Graduate Constituency Election ) निवडणुकीवरुन राज्याच्या राजकारण चांगलेच तापले आहेत.  नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून (Congress) सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज  दाखल केला (Maharashtra Political News). यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला.कुणी लिहिली तांबेंच्या उमेदवारीची स्क्रिप्ट? काँग्रेसला कुणी बनवलं 'मामा'? असे अनेर प्रश्न उपस्थित झाले आहे. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला जोर आला आहे. 

राजकारणात योग्य वेळी योग्य धोरणं ठरवून निर्णय घ्यावे लागतात - देवेंद्र फडणवीस

राजकारणात योग्य वेळी योग्य धोरणं ठरवून निर्णय घ्यावे लागतात असं सूचक विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेबाबत केलंय. तसंच सत्यजित तांबेच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा घटनाक्रम जसा दिसतोय तसा नाही. त्याबाबत योग्यवेळी बोलणार असल्याचंही त्यांनी नमूद केला आहे. 

नाट्यमय घडामोडींचं स्क्रिप्ट फडणवीसांनी लिहीली?

सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरून महाराष्ट्राच्या राजकीय पटावर नवं नाट्य सुरू झाले आहे. या नाट्याचे पडद्यामागचे सूत्रधार समजले जातायत ते देवेंद्र फडणवीस. काँग्रेस पक्षानं डॉ. सुधीर तांबे यांना पुन्हा उमेदवारी दिली. मात्र, त्यांनी अर्ज भरलाच नाही. त्यांच्याऐवजी सुपुत्र सत्यजित तांबे अपक्ष म्हणून नाशिक पदवीधर मतदारसंघातून उभे राहिले. या सगळ्या नाट्यमय घडामोडींचं स्क्रिप्ट फडणवीसांनी लिहिल्याचं बोललं जातंय. काही दिवसांपूर्वी पुस्तक प्रकाशन सोहळ्यात त्यांनीच याबाबतचं सूतोवाच केलं होतं. 

थोरात विरुद्ध तांबे असा मामा-भाच्यांचा गृहकलह

सत्यजित तांबेंना उमेदवार केल्यानं थोरात विरुद्ध तांबे असा मामा-भाच्यांचा गृहकलह सुरू झाला आहे. एबी फॉर्म दिलेल्या सुधीर तांबेंनी माघार घेतल्यानं काँग्रेसचाही गेम झाला. तिसरीकडं नगर जिल्ह्यात राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासाठी हा चेकमेट असल्याचं बोललं जात आहे. 

भाजपच्या चार उमेदवारांनी अर्ज भरूनही त्यांना एबी फॉर्म देण्यात आलेला नाही

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी अखेर सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय. त्यांनी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म जोडला नसल्याने त्यांची उमेदवारी अपक्ष जाहीर करण्यात आलीय. विशेष म्हणजे आज राबवण्यात आलेल्या छाननी प्रक्रियेत भाजपच्या चार उमेदवारांनी अर्ज भरूनही त्यांना एबी फॉर्म देण्यात आलेला नाही, हे समोर आलंय. त्यामुळे या खेळीमागे भाजपची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याची चर्चा सध्या नगर जिल्ह्यात रंगली आहे. 

भाजपला आज दुसऱ्यांचे घर फोडताना आनंद होतोय - पटोले

भाजपला आज दुसऱ्यांचे घर फोडताना आनंद होत आहे. त्यांचे घर फुटेल तेव्हा त्यांना याच दुःख कळेल, अशी प्रतिक्रिया नाशिकमधील नाट्यमय घडामोडीनंतर नाना पटोले यांनी दिली. भाजप दुसऱ्याचे घर तोडण्याची, फोडण्याची काम करत आहे. त्यांचेही घर एकदिवस फूटल्याशिव राहणार नाही, असे नाना पटोले म्हणाले.