अप्रतिम व्हेज-नॉनव्हेज पदार्थांसाठी रवीराज

नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी हे रेस्टॉरंट खूप चांगलं मानलं जातं, येथील प्रत्येक पदार्थाला चांगली चव आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 27, 2017, 10:42 PM IST

मुंबई : नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी हे रेस्टॉरंट खूप चांगलं मानलं जातं, येथील प्रत्येक पदार्थाला चांगली चव आहे. विशेष म्हणजे हे हॉटेल एक रेस्टोबार आहे, पण येथील पदार्थांची चव पाहून फक्त खाण्यासाठी जाणाऱ्यांची संख्याच येथे जास्त आहे.

 मासे, चिकन मिळण्याचं तसेच व्हजेटेरियनसाठी चांगलं जेवण येथे मिळत म्हणून कुणालाही नाराज होण्याची गरज नाही. गुगलवर देखील खूप चांगला फीडबॅक लोकांनी रवीराज या रेस्टॉरंट विषयी दिला आहे. रवीराज या रेस्टॉरंटचा संपूर्ण पत्ता या व्हिडीओ सर्वात खाली देण्यात आला आहे. हे रेस्टॉरंट हे फॅमिली रेस्टॉरंट नाही.