मुंबई : महाराष्ट्रातल्या मिसळ या खाद्यपदार्थाला सध्या सुगीचे दिवस आले आहेत असंच म्हणावं लागेल...कारण गेल्या दीड महिन्यात मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरात डझनावरी मिसळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं.
आता मिसळीला राजकीय व्यासपीठही मिळू लागलं आहे. मनसेचे माहिम विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार आणि पक्षाचे नेते नितिन सरदेसाई यांनी मिसळ महोत्सवाचे आयोजन केलंय. माटुंग्याच्या मोगल लेनमध्ये येत्या रविवार पर्यंत हा मिसळ महोत्सव सुरु असणार आहे.
पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी या महोत्सवाचे उदघाटन केलं. त्यांनी मिसळीच्या सर्व स्टॉल्सना भेट दिली आणि विक्रेत्यांशी संवाद साधला. महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून 20 मिसळ विक्रेते या महोत्सवात सहभागी झाले आहेत. मिसळीच्या विविध चवींचा आस्वाद घेण्यसाठी खवय्यांची इथे रीघ लागलीय.