परभणीच्या कुटुंबाचा शिवाजीपार्कवर आत्मदहनाचा प्रयत्न

 परभणीच्या कुटुंबाने शिवाजीपार्कवर आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रय़त्न फसला. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 26, 2018, 09:21 PM IST

मुंबई : पोलीस कोठडीत मारहाणीत पतीचा मृत्यू झाला आणि त्यावर तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ परभणीच्या कुटुंबाने शिवाजीपार्कवर आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रय़त्न फसला. 

शिवाजी पार्कवर आत्मदहनाचा प्रयत्न

समशेर खान यांची पत्नी अखिला बेगम, समशेर खान यांचे बंधू यासीन खान आणि त्यांच्या कुटुंबातल्या सहा जणांनी शिवाजी पार्कवर आत्मदहनाचा प्रयत्न केला. समेशर खान यांच्या मृत्यूला जबाबदार पोलिसांचं तातडीने निलंबन करावं अशी या कुटुंबाची मागणी होती. 

कोणीच दाद देत नाही असा खान कुटुंबियांचा आरोप

सरकार दरबारी वारंवार हे प्रकरण कानावर घातलं पण आपल्याला कोणीच दाद देत नाही असा खान कुटुंबियांचा आरोप आहे. या कुटुंबाने काल आझाद मैदानातही आंदोलन करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना परवानगी नाकारण्यात आली. आज त्यांनी राज्यपालांना देण्यासाठी निवेदनही लिहून आणलं होतं.