रेल्वे डब्यात जड वस्तू फेकल्यानं तरुणी गंभीर जखमी

एक तरुणी यामध्ये जखमी झालीयं.​

Updated: Oct 5, 2018, 07:37 AM IST
रेल्वे डब्यात जड वस्तू फेकल्यानं तरुणी गंभीर जखमी  title=

मुंबई : रेल्वेनं प्रवास करताना महिला डब्यात शिरून चोरी करणं, छेडछाड करणं हे नेहमीच झालायं. यासंदर्भातल्या हजारो तक्रारी रेल्वे पोलिसांकडे नोंदवल्या जातात. पण हे सत्र काही कमी होण्याचे नाव घेत नाही. यामध्ये आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. एक तरुणी यामध्ये जखमी झालीयं.

तरुणी गंभीर जखमी 

उपनगरीय गाडीच्या प्रथम वर्गाच्या डब्यात जड वस्तू फेकल्यानं तरुणी गंभीर जखमी झालीय. मुंब्रा आणि दिवा स्थानकाच्या दरम्यान ही घटना घडलीय.

रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडलीय. कांचन हटले असं या तरुणीचं नाव असून ती दिव्याची राहणारी आहे.

खाजगी कंपनीत ती मोठ्या पदावर कार्यरत आहे. तिच्यावर डोंबिवलीत खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.