मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. शिवडी न्यायालयाने आज राहुल यांना जामीन दिला आहे. कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर राहुल गांधी यांनी वादग्रस्त विधान केले होते.
Defamation case filed against Rahul Gandhi for allegedly linking Gauri Lankesh's murder with "BJP-RSS ideology": Rahul Gandhi pleads not guilty. He has been released on Rs 15000 surety amount. Ex MP Eknath Gaikwad has given surety for Rahul Gandhi. pic.twitter.com/QVGlntFi2L
— ANI (@ANI) July 4, 2019
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज मुंबईतल्या शिवडी न्यायालयात हजर राहिलेत. कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर राहुल गांधी यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच प्रकरणाची सुनावणी शिवडी न्यायालयात सुरू होती. या सुनावणीला राहुल गांधी न्यायालयात हजर होते.
आज सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास राहुल गांधी शिवडी न्यायालयात पोहोचलेत.अध्यक्षपदापासून अधिकृतपणे दूर झाल्यावरही मुंबईत राहुल गांधी यांच्या स्वागताची कार्यकर्त्यांनी तयारी केली होती.
आपण आता काँग्रेस अध्यक्ष नाही, यापूर्वीच आपण राजीनामा दिला असून पक्षाच्या कार्यकारी समितीनं लवकरात लवकर नवा अध्यक्ष निवडावा, असं राहुल गांधींनी म्हटलंय. त्यांनी आपला राजीनामाच जाहीर केल्यामुळे पक्षासमोर नवा पेच निर्माण झालाय. राजीनामापत्र जाहीर केल्यानंतर राहुल गांधींनी आपल्या ट्विटर हँडलवरून काँग्रेस अध्यक्ष या पदाचा उल्लेख काढून टाकलाय. त्यामुळे ते राजीनाम्यावर ठाम असल्यावर शिक्कामोर्तब झालं असून आता पक्षाला लवकरच नवा अध्यक्ष शोधावा लागणार आहे.