मुंबई : ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यात आला आहे. निवडणुकीच्या तोंडावर राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबईत ५०० चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीच्यावेळी ५०० चौरस फुटांच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचे जाहीर केले होते. तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे पालिकेने पाठिविला होता.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत एकूण अठरा निर्णय घेण्यात आले आहे. यात मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील मालमत्ता कर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवसेनेने या संदर्भात मागणी केली होती. स्वयंपूनर्विकास धोरणाला मंजुरी देण्यात आली. रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांमधील लाखो प्रकल्पबधितांना दिलासा सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जातींसाठीच्या 165 निवासी शाळांना वीस टक्के अनुदान मंजूर एसआरएमधल्या संक्रमण शिबिरातील घुसखोरांना दंड आकारून नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईत एकूण २८ लाख रहिवाशी घरे असून त्यापैकी १५ लाख घरे ही ५०० चौरस फुटापर्यंतची आहेत. या घरांना मालमत्ता कर माफ झाल्याने मुंबई महाहालिकेचे दरवर्षा ३४० कोटी रूपयांचे उत्पन्न होणार आहे. त्यामुळे मुंबई पालिकेला मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.