पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे खासगी वाहतूकदारांनी वाढवले तिकीट दर

पेट्रोल डिझेलच्या दरातल्या दरवाढीचा मोठा फटका महागाईच्या स्वरूपात बसणार आहे. खासगी वाहतूकदारांनी आपल्या दरात १ जूनपासून वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. 

Updated: May 21, 2018, 04:50 PM IST

मुंबई : पेट्रोल डिझेलच्या दरातल्या दरवाढीचा मोठा फटका महागाईच्या स्वरूपात बसणार आहे. खासगी वाहतूकदारांनी आपल्या दरात १ जूनपासून वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. 

१ जूनपासून दरात ३० टक्के वाढ होणार आहे. शाळेच्या बस आणि टूरिस्ट टॅक्सीच्या दरातही वाढ होणार आहे. इंधनाच्या दरात रोज वाढ होतेय. त्यामुळे ही दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

याआधी २ वर्षांपूर्वी खासगी वाहतूकदारांनी दरवाढ केली होती. आता वाहतूकदारांनी घेतलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिक आणि पालकांना मोठा फटका बसणार आहे.