परेल स्थानकातल्या पादचारी पुलाचा नव्या गर्डरसाठी पॉवर ब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावर आज परेल स्थानकातल्या पादचारी पुलाचा नवा गर्डर टाकण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 18, 2018, 07:52 AM IST
परेल स्थानकातल्या पादचारी पुलाचा नव्या गर्डरसाठी पॉवर ब्लॉक  title=

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर आज परेल स्थानकातल्या पादचारी पुलाचा नवा गर्डर टाकण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

नवीन पादचारी पुलाचे काम

सकाळी ८.३० ते दुपारी ४.३० वाजेपर्यत परेल स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ आणि ४ वर १२ मीटर लांबीच्या नवीन पादचारी पुलाच्या कामासाठी, अप जलद आणि शंटिग रेल्वे लाईनवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

दादर स्थानकात थांबा नाही

या ब्लॉक दरम्यान अप जलद मार्गावरील लोकल गाड्यांची वाहतूक मांटुगा ते भायखळा स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावरुन चालवली जाईल. तसंच अप मार्गावरुन मुंबईकडे येणा-या सर्व मेल-एक्सप्रेस गाड्या मांटुगा ते भायखळा दरम्यान अप धिम्या मार्गावरुन धावतील. या गाड्यांना दादर स्थानकात थांबा देण्यात येणार नाही. त्यामुळे या गाड्यांना ठाणे स्थानकात थांबा दिला जाईल. 

हार्बरवर ब्लॉक नाही

या कामामुळे मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बरवर ब्लॉक नसेल. तर पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते नायगाव स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावरील सर्व लोकल सेवा अप आणि डाउन धिम्या मार्गावरुन चालवल्या जातील.