मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक, दादर स्थानकात थांबा नाही

मध्य रेल्वे मार्गावर उद्या (रविवारी) मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 17, 2018, 09:05 PM IST
मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक, दादर स्थानकात थांबा नाही  title=

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर उद्या (रविवारी) मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आलाय.

परेल स्थानकातील पादचारी पुलाचा नववा गर्डर टाकण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ८.३० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत प्लॅटफॉर्म ३ आणि ४ वर तर परेल स्थानकातील १२ मीटर लांबीचा नवीन पादचारी पुलाच्या कामासाठी अप जलद आणि शटिंग रेल्वे लाईनवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

यामुळे उपनगरीय लोकलच्या मार्गात अनेक बदल करण्यात येणार आहेत. ब्लॉक दरम्यान अप जलद मार्गावरील लोकल गाड्यांची वाहतूक मांटुगा ते भायखळा स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहे.

ब्लॉक दरम्यान गाड्या दादरला थांबणार नाहीत

तसेच अप मार्गावरुन मुंबईकडे येणाऱ्या सर्व मेल-एक्सप्रेस गाड्या मांटुगा ते भायखळा दरम्यान अप धिम्या मार्गावरुन चालविण्यात येणार असल्यामुळे या गाड्या १५-२० मिनिटे उशिराने धावणार आहेत. तसेच या गाड्यांना दादर स्थानकात थांबा देण्यात येणार नाही. या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी रविवारी गाड्यांना ठाणे स्थानकात थांबा देणार आहे. 

यामध्ये ११०१० पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस, २२१०२ मनमाड-मुंबई राज्यराणी एक्सप्रेस, १२१२६ पुणे-मुंबई प्रगती एक्सप्रेस, १२१२४ पुणे-मुंबई डेक्कन क्वीन, १२११० मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेस, १२३२१ हावडा-मुंबई मेल व्हाया चौकी, ११०२४ कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस, १२१४० नागपुर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस, १७०३२ हैद्राबाद-मुंबई एक्सप्रेस, ११०४२ चैन्नई-मुंबई एक्सप्रेस, ११०९४ वाराणसी-मुंबई महानगरी एक्सप्रेस या गाड्यांना ठाणे स्थानकात थांबा देण्यात येणार आहे.