राहुल गांधी यांच्या मुंबईतील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली

काँग्रेसचे (Congress) नेते खासदार राहुल गांधी  (Rahul Gandhi) यांच्या शिवाजी पार्कवरील सभेला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. 

Updated: Dec 14, 2021, 08:58 AM IST
राहुल गांधी यांच्या मुंबईतील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली title=
संग्रहित छाया

मुंबई : काँग्रेसचे (Congress) नेते खासदार राहुल गांधी  (Rahul Gandhi) यांच्या शिवाजी पार्कवरील सभेला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. यानंतर मुंबई काँग्रेसने पोलीस आणि महापालिकेविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. याबाबत आज सुनावणी होण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी यांची 28 डिसेंबर रोजी मुंबईत शिवाजी पार्क येथे सभा घेण्यात येणार होती. महाराष्ट्र काँग्रेसकडून त्याबाबत जय्यत तयारी सुरु केली होती. त्यानुसार काँग्रेसकडून मुंबई महापालिका, नगरविकास खात्याकडे सभेच्या परवानगीसाठी 15 दिवसांपूर्वीच अर्ज केला होता. मात्र, अद्याप याबाबत मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे राहुल गांधी यांच्या सभेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

दरम्यान, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राजधानी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांची भेट घेतली होती. त्यानंतर मीडिशीयाशी बोलताना राहुल गांधी डिसेंबरमध्ये मुंबई दौऱ्यावर येणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा मुंबई दौरा निश्चित झाला होता. मात्र, अद्याप सभेबाबत परवानगी न मिळाल्याने बैठकीबाबत संभ्रम आहे.

काँग्रेस स्थापना दिनी म्हणजे 28 डिसेंबर रोजी त्यांची मुंबईत सभाही घेण्यात येणार होती. मात्र, मुंबई पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नाही. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे काँग्रेस नेते नाराज झाले आहेत. याबाबत प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचे संकेत दिले आहेत.