PM Modi in Mumbai: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे गुरुवारी विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुंबईत (Mumbai) आले आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून भाजप (BJP) आणि शिंदे गटाकडून मुंबईत पंतप्रधान मोदींच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु आहे. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील सुमारे 38 हजार 800 कोटी रुपयांच्या (PM Modi inaugurate Mumbai Metro) विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन झालं. त्यावेळी उपस्थित असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोले लगावले आहेत. (PM Narendra Modi Some people betrayed devendra Fadnavis mocks Uddhav Thackeray in front of Modi mumbai marathi news)
पंतप्रधान मोदी प्रवास करणार असलेला मेट्रो प्रकल्पाचा परिसर, बीकेसी मैदान आणि संपूर्ण शहरात भाजपकडून झेंडे आणि बॅनर्स लावण्यात आल्याने सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. नरेंद्र मोदी यांची सभा होणार असल्याने केंद्रीय मंत्र्यांची टीम देखील मुंबईत दाखल झाल्याचं पहायला मिळतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल कोश्यारींनी फडणवीसांचं कौतूक केलं. त्यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी मोठं वक्तव्य केलंय.
छत्रपती शिवाजी महाराजांना आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडतकरांना मानवंदना करून फडणवीसांनी सुरूवात केली. अखिल विश्वचे सर्वात लोकप्रिय नेता, असा उल्लेख करत फडणवीसांनी भाषणाची सुरूवात केली. तुम्ही पीएम म्हणाला होता की, डब्बल इंजिन सरकार आणा... तसं आलं...पण काहींनी बेईमानी केली, पण आज बाळासाहेब ठाकरे विचारांचे एकनाथ शिंदे यांनी भूमिका धेत पुन्हा आपले सरकार आणलं, असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोले लगावला.
दरम्यान, रोज मोठ्या प्रमाणात पाणी समुद्रात सोडला जात होतं. 20 -25 वर्ष मुंबई महापालिकेवर राज्य केलं. त्यांनी फक्त फिक्स डिपॉझिट केले. स्वत:ची घरं भरली. पण मुंबईकरांना शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न केला नाही, असं म्हणत फडणवीसांनी आगामी निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंविरूद्ध दंड थोपटले आहे. फडणवीसांच्या भाषणानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी देखील तोंडसुख घेतल्याचं पहायला मिळालं आहे.