लोकल प्रवासासाठी अजून इतके दिवस तरी इतरांना परवानगी नाही

मुंबईच्या लोकलमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतीला लोकांना प्रवास करण्याची परवानगी 

Updated: May 29, 2021, 05:50 PM IST
लोकल प्रवासासाठी अजून इतके दिवस तरी इतरांना परवानगी नाही title=

मुंबई : मुंबईच्या लोकलमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतीला लोकांना प्रवास करण्याची परवानगी आहे. त्यामुळे इतर लोकांना लोकलमधून प्रवास करता येत नाहीये. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा वाढल्यानंतर पुन्हा एकदा लॉकडाऊनचा निर्णय़ घ्यावा लागला होता.

लोकलमध्ये इतरांना अजून 15 दिवस तरी प्रवासाची परवानगी मिळण्याची शक्यता नाही आहे. त्यामुळे जी आहे हीच परिस्थिती राहणार आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकं लोकलमधून प्रवास करु शकणार आहेत.

महाराष्ट्रात एकूण 4 टप्प्यांमध्ये अनलॉक केलं जावू शकतं. कोरोना रुग्णांची संख्या अजूनही कमी झालेली नाही. आकडा खूप वाढत नसला तरी दररोज वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्येनुसार तरी परवानगी दिली जावू शकत नाही. लॉकडाऊनमुळे नियंत्रणात आलेला संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार अजून तरी याबाबत विचारपूर्वकच निर्णय घेईल.

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1,73,790 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3,617 लोकांचा मृत्यू झाला आहे. 2,84,601 लोकांनी कोरोनवर मात केली आहे. देशात एकूण संक्रमितांची संख्या 2,77,29,247 झाली असून एकूण मृतांचा आकडा 3,22,512 वर पोहोचला आहे. देशात अजूनही 22,28,724 सक्रीय रुग्ण आहेत.