दुबईतून आलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन सक्तीचे, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कठोर नियम

Omicron cases  : दुबईहून आलेल्या प्रवाशांना सात दिवसांचं क्वारंटाईन सक्तीचे करण्यात आले आहे.  

Updated: Dec 25, 2021, 08:05 AM IST
दुबईतून आलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन सक्तीचे, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कठोर नियम  title=
संग्रहित छाया

मुंबई : Omicron cases  : दुबईहून आलेल्या प्रवाशांना सात दिवसांचं क्वारंटाईन सक्तीचे करण्यात आले आहे. ओमायक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर निर्बंध घालण्यासाठी राज्य सरकारने आणि महापालिका प्रशासनाने नियमावली जाहीर केली आहे. ( New quarantine rules for Mumbai residents arriving from Dubai, 7 days home qurantine)

खास दुबईहून येणाऱ्या प्रवाशांसाठी आणखी कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. ओमायक्रॉनचा धोका असलेल्या 12 देशांची यादी भारत सरकारने तयार केली आहे. या 12 देशातील प्रवासी अनेकदा दुबईमार्गे आपल्या पुढील प्रवासाला जात असतात. त्यामुळे दुबई विमानतळावर अनेक देशातील प्रवासी उतरतात व त्यांचा एकमेकांशी संपर्क होतो. त्यामुळे यापुढे दुबईतून येणाऱ्या प्रवाशांवरही पालिका प्रशासनाचे लक्ष असणार आहे. 

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नियम कठोर

- सात दिवसांचे गृह विलगीकरण सक्तीचे करण्यात आले आहे.

- दुबईतून आलेल्या प्रवाशांना सार्वजनिक परिवहन सेवा वापरता येणार नाही. या प्रवाशांची प्रवासाची सोय जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केली जावी.

- विमानतळावर उतरल्यानंतर आरटीपीसीआर चाचणी केली नाही तरी पुढील सात दिवस त्यांच्याशी मुंबईपालिकेच्या विभाग कार्यालयातील नियंत्रण कक्षामार्फत संपर्क ठेवला जाणार. सातव्या दिवशी त्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे.

- प्रवासी बाधित नसला तरी त्याला पुढील सात दिवस सतर्क राहावे लागणार आहे. मात्र प्रवासी बाधित आढळल्यास त्याला क्वारंटाईन केले जाणार आहे.

- दुबईहून मुंबई विमानतळावर उतरलेल्या पण राज्याच्या अन्य भागात जाणाऱ्या प्रवाशांशी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत समन्वय साधला जाणार आहे.