मुंबईसाठी चिंताजनक बातमी, येथील 12 कर्मचाऱ्यांना कोरोना

Coronavirus : एक चिंताजनक बातमी.12 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

Updated: Dec 25, 2021, 07:58 AM IST
मुंबईसाठी चिंताजनक बातमी, येथील 12 कर्मचाऱ्यांना कोरोना  title=
संग्रहित छाया

मुंबई : Coronavirus : एक चिंताजनक बातमी. दादरमधील एका पॅथोलॉजी लॅबमधील 12 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दादर पश्चिमेतील लाल पॅथोलॉजी लॅबमधील हे सर्व कर्मचारी आहेत. (Corona to 12 employees in the Lal pathology lab at Mumbai)

या लॅबच्या पॅन्ट्रीमध्ये काम करणाऱ्या एका मुलाला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर लॅबमधील सर्व 39 कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता यातील 12 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या जी-उत्तर विभागाकडून लॅब सिल करण्यात आली आहे. 

दरम्यान, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात आलेत. त्यानुसार रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत राज्यात जमावबंदी असेल. या काळात 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. याशिवाय लग्नसमारंभ, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांवर पुन्हा एकदा निर्बंध लावण्यात आले आहे. क्षमतेच्या 50 टक्के जास्त लोकांना उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली आहे.