धक्कादायक! अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी उत्तर भारतातल्या महिलांचा वापर, अशी आहे Modus Operandi

एनसीबीने केलेल्या कारवाईत अंमली पदार्थ तस्करांच्या रॅकेटचा मोठा खुलासा

प्रशांत अंकुशराव | Updated: Oct 18, 2022, 10:21 PM IST
धक्कादायक! अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी उत्तर भारतातल्या महिलांचा वापर, अशी आहे Modus Operandi title=

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) सत्तापालट होण्या आधी गुवाहाटी (Guwahati) शहर चांगलंच प्रसिद्ध झालं होतं. आता पुन्हा एकदा गुवाहाटी शहराचं नाव चर्चेत आलं आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी (Drug Trafficking) उत्तर भारतातील (North India) महिलांचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एनसीबी (NCB) मुंबई आणि दिल्ली युनिटने कारवाई करत दोन इथोपियन नागरिक (Ithiopian Citizen) आणि भारतातील एका महिलेला अटक केली होती. तिच्या चौकशीत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आफ्रिकन नागरिक गुवाहाटी, अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, सिक्कीम इथल्या महिलांना टार्गेट करून त्यांच्याशी लग्न करतात. नंतर त्यांचा अंमली पदार्थ्यांच्या तस्करीसाठी वापर केला जातो. आफ्रिका खंडातील अंमली पदार्थाच्या तस्करांना भारतात ड्रग्स हब्स बनवायचं असल्याचंही समोर आलं आहे.

एनसीबीची कारवाई
एनसीबीने एका नायजेरियन आरोपीला अटक केली होती. त्याच्या चौकशीनंतर एनसीबी दिल्ली युनिटने दिल्लीत एका महिलेला ताब्यात घेतलं. या महिलेकडून 4. 984 किलो कोकेन जप्त केलं. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत जवळपास 50 कोटींपेक्षा जास्त आहे. महिलेच्या चौकशीनंतर एनसीबीने दोन इथोपियन नागरिकांना अटक केली. 

हे तस्कर मुंबई आणि दिल्लीतून नेटवर्क चालवत होते. मुंबईत एका हॉटेलमध्ये एक महिला राहत असून तिच्याकडे 2 किलो कोकेन असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. माहितीच्या आधारे एनसीबीने त्या महिलेला अटक केली. तिच्या चौकशीत ड्रग तस्करीसाठी हिंदुस्थानी महिलांचा कसा वापर होतो हे धक्कादायक सत्य समोर आलं आहे.

अंमली पदार्थ तस्कर हे हिंदुस्थानात आल्यावर रेकी करतात. रेकी केल्यानंतर विमानतळावर ड्रग पकडू नये म्हणून कोणता मार्ग निवडावा याचं प्लान तयार करतात. हिंदुस्थानी महिलेशी लग्न केल्याने त्यांना तस्करी करणं सोपं जातं. एनसीबीने दिल्ली इथून अटक केलेली महिला ही मुख्य सूत्रधाराची पत्नी आहे आणि ती नॉर्थ ईस्ट मधील रहिवासी आहे.