कर्जमाफीनंतर मध्यवर्ती निवडणुका नाही - मुनगंटीवार

 शेतकरी कर्जमाफीनंतर मध्यवर्ती निवडणुकांची शक्यता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी फेटाळून लावली आहे. तसंच शेतकरी संपामध्ये मुख्यमंत्री एकाकी पडले असं म्हणणं म्हणजे मोठा गैरसमज असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. सरकार कर्जमाफीकरुन पुन्हा निवडणुका घेईल अशी चर्चा होती.

Updated: Jun 6, 2017, 05:05 PM IST
कर्जमाफीनंतर मध्यवर्ती निवडणुका नाही - मुनगंटीवार title=

मुंबई : शेतकरी कर्जमाफीनंतर मध्यवर्ती निवडणुकांची शक्यता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी फेटाळून लावली आहे. तसंच शेतकरी संपामध्ये मुख्यमंत्री एकाकी पडले असं म्हणणं म्हणजे मोठा गैरसमज असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. सरकार कर्जमाफीकरुन पुन्हा निवडणुका घेईल अशी चर्चा होती.

महाराष्ट्र बंद यशस्वी झाल्यानंतर आज शेतकरी संघटनांनी सरकारी कार्यालयांना टाळं ठोकण्याचा इशारा दिलाय. पुणतांब्यात शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात समोर सरकारचं प्रतीकात्मक दहावं घालून निषेध आणखी तीव्र केलाय. दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी इथेच मुंडनही केलं होतं. तिकडे सांगलीतही आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटला टाळं ठोकून निषेध व्यक्त करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. यावेळी पोलीसांनी 20 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.