31 ऑक्टोबरआधी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार - मुख्यमंत्री

 एकीकडे शेतकरी संपाचा सहावा दिवस असताना सरकारनं शेतक-यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. 31 ऑक्टोबरआधी शेतक-यांना कर्जमाफी देणार असा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिलीय. 

Updated: Jun 6, 2017, 03:12 PM IST
31 ऑक्टोबरआधी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार - मुख्यमंत्री title=

मुंबई :  एकीकडे शेतकरी संपाचा सहावा दिवस असताना सरकारनं शेतक-यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. 31 ऑक्टोबरआधी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, असा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

अडचणीत असलेल्या गरजू शेतक-यांना कर्जमाफी देण्याची सरकारची भूमिका असल्याचंही ते म्हणालेत. राज्याच्या इतिहासातील ही सगळ्यात मोठी कर्जमाफी असेल असं सांगत त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला टोला लगावलाय. शेतकरी संपाबाबत सरकारची चर्चेची तयारी असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

यावेळी शेतकरी आंदोलनाआडून राजकीय पोळी भाजणाऱ्यांवरही मुख्यमंत्र्यांनी हल्लाबोल केलाय. आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी शेतकऱ्यांना देणार आहोत. मात्र, खऱ्या शेतकऱ्यांशी, शेतकरी नेत्यांशी चर्चा करु, आमचे विरोधक असले तरी चर्चा करु. शेतकऱ्यांच्या संपाबाबत आम्ही चर्चेला तयार, असे मुख्यमंत्री म्हणालेत.