मुंबई : कमला मिल कम्पाऊंड दुर्घटनेची CBI कडून चौकशी करा, अशी मागणी नितेश राणे यांनी केलीय.
सध्या महापालिकेची या हॉटेल्सवरची कारवाई म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केलाय. कारवाईसाठी महापालिकेनं पंधरा दिवसांची मुदत का दिली, पंधरा दिवसांची मुदत सेटलमेंटसाठीच देऊन, जे सेटलमेंट करणार नाहीत, त्यांच्यावर मुंबई महापालिका कारवाई करणार का, असा सवाल नितेश राणे यांनी केलाय. त्याचवेळी नितेश राणे यांनी नाईटलाईफ रुफटॉप संकल्पनांचे आपण समर्थकच आहोत, असंही स्पष्ट केलंय.
कमला मिलमधील पबला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी आक्रामक पावित्रा घेतला आहे. राणे यांनी मुंबई महापालिकेवर चांगलीच आगपाखड केलीये. ‘हॉटेल्समध्ये अनधिकृत प्रकार आणि नियमांचे उल्लंघन होत होते, त्या चोरीत महापालिका सहभागी होती. अंडर टेबल डिल होत होती’, असा आरोप त्यांनी लावला आहे. तर येणाऱ्या १५ तारखेला मुंबई महापालिकेवर मोर्चा काढणार, असेही ते म्हणाले.
सर्व आधीका-यांवर ACB ने कारवाई केली पाहिजे. १५ दिवस दिले ते म्हणजे सेटलमेंट साठी दिले आहेत, जे सेटलमेंट करणार नाहीत त्यांच्यावर महापालिका कारवाई करणार. १५ दिवसानंतर सर्व गोष्टी सुरळीत होणार. बीएमसीकडून कारवाईचे फक्त ढोंग केले जात आहे. ही सर्व कारवाई धूळफेक आहे. ३०-३१ तारखेला तुटलेली हॉटेल्स आज सुरळीत सुरु आहेत. तसेच आयक्तांचे विधान खूप आश्चर्यकारक असल्याचे राणे म्हणाले. त्यांनी अधिका-यांनी भ्रष्टाचार केल्याची अप्रत्यक्ष कबुलीच दिलीये.