पुढच्या वर्षी बाप्पाच आगमन 'या' दिवशी

 सगळीकडे गणरायाच्या आगमनाची धूम सुरू आहे. मंडळांमध्ये बाप्पाच्या तयारीत कार्यकर्ते दिसतात. तर घरोघरी गणेशाच्या तयारीसाठी कुटुंबांची वेगळीच रेलचेल आहे. तसंच यंदा बाप्पा १२ दिवस आपल्याकडे विराजमान होणार आहेत.

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 24, 2017, 06:50 PM IST
पुढच्या वर्षी बाप्पाच आगमन 'या' दिवशी  title=

मुंबई : सगळीकडे गणरायाच्या आगमनाची धूम सुरू आहे. मंडळांमध्ये बाप्पाच्या तयारीत कार्यकर्ते दिसतात. तर घरोघरी गणेशाच्या तयारीसाठी कुटुंबांची वेगळीच रेलचेल आहे. तसंच यंदा बाप्पा १२ दिवस आपल्याकडे विराजमान होणार आहेत.

त्यामुळे यंदा १२ दिवस बाप्पाचा आनंद आणि आशिर्वाद लुटण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. यंदा अधिक मास असल्यामुळे बाप्पा ऑगस्ट महिन्यात आले. मात्र पुढल्यावर्षी हे चित्र थोडं बदललं आहे. पुढच्या वर्षी बाप्पा सप्टेंबर महिन्यात येणार आहेत. पुढच्या वर्षी ज्येष्ठ अधिक महिना येणार असल्याने गणपती बाप्पाचे आगमन १९ दिवस उशीराने गुरुवार, दि. १३ सप्टेंबर २०१८ रोजी होणार असल्याचे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक  दा. कृ. सोमण यांनी सांगितले. गणेश भक्तांच्या माहिती करीता त्यांनी पुढील २१ वर्षातील ' गणेश चतुर्थीचे दिवस ' आणि कोणत्या वर्षी कोणता अधिक महिना येणार आहे त्याची माहिती ही दिली.

पुढील २१ वर्षात या दिवशी येणार बाप्पा 

(१) गुरूवार , १३ सप्टेंबर २०१८ ( ज्येष्ठ अधिकमास ) 
(२) सोमवार, २ सप्टेंबर २०१९
(३) शनिवार , २२ आॅगस्ट २०२० ( आश्विन अधिकमास ) 
(४) शुक्रवार, १० सप्टेंबर २०२१ 
(५) बुधवार, ३१ आॅगस्ट २०२२
(६) मंगळवार, १९ सप्टेंबर २०२३ ( श्रावण अधिकमास )
(७) शनिवार, ७ सप्टेंबर २०२४
(८) बुधवार , २७ आॅगस्ट २०२५
(९) सोमवार , १४ सप्टेंबर २०२६ ( ज्येष्ठ अधिकमास ) 
(१०) शनिवार , ४ सप्टेंबर २०२७ 
(११) बुधवार, २३ आॅगस्ट २०२८ 
(१२) मंगळवार, ११ सप्टेंबर २०२९ ( चैत्र अधिकमास ) 
(१३) रविवार, १ सप्टेंबर २०३० 
(१४) शनिवार, २० सप्टेंबर २०३१ ( भाद्रपद अधिकमास ) 
(१५) बुधवार, ८ सप्टेंबर २०३२
(१६) रविवार, २८ आॅगस्ट २०३३
(१७) शनिवार, १६ सप्टेंबर २०३४ ( आषाढ अधिकमास ) 
(१८) बुधवार, ५ सप्टेंबर २०३५ 
(१९) रविवार , २४ आॅगस्ट २०३६
(२०) शनिवार, १२ सप्टेंबर २०३७ ( ज्येष्ठ अधिकमास )
(२१) गुरुवार, २ सप्टेंबर २०३८