गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा करताना चुकूनही करू नका हे काम

गणेश चतुर्थी भगवान गणेशाच्या जन्मदिवसाच्या रूपात साजरी केली जाते. यंदा गणेश चतुर्थी २५ ऑगस्ट म्हणजे शुक्रवारी आली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजनाला खूप महत्व असतं. या पूजेत छोट्या-छोट्या गोष्टींना विशेष महत्व असतं.

Updated: Aug 24, 2017, 06:24 PM IST
गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा करताना चुकूनही करू नका हे काम title=

मुंबई : गणेश चतुर्थी भगवान गणेशाच्या जन्मदिवसाच्या रूपात साजरी केली जाते. यंदा गणेश चतुर्थी २५ ऑगस्ट म्हणजे शुक्रवारी आली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजनाला खूप महत्व असतं. या पूजेत छोट्या-छोट्या गोष्टींना विशेष महत्व असतं.

यावर्षी गणेश चतुर्थीला ५८ वर्षांनंतर एक विशेश योग आला आहे. त्यामुळे यंदाचं वर्ष अधिक खास झालं आहे. त्यामुळे जर गणेश पूजा पूर्ण विधी-विधानासोबत केली गेली तर त्याचा भाविकांना मोठा फायदा होतो. पूजेदरम्यान जर तुमच्याकडून काही चूक झालीच तर ते अशुभ मानलं जातं. बुधवारी भगवान गणेशाची आराधना करणे भाविकांसाठी फायद्याची मानली जाते. हिंदू संस्कृतीत भगवान गणेशाला प्रथम स्थान आहे. प्रत्येक मंगल कार्याला सुरू करण्यापूर्वी भगवान गणेशाची पूजा केली जाते. 

पूजेचा शुभ मुहूर्त :

यंदा गणेश चौर्थी २५ ऑगस्ट २०१७ आहे. चतुर्थी २४ ऑगस्ट २०१७ ला रात्री ८ वाजून २७ मिनिटांनी सुरू होणार आहे आणि २५ ऑगस्ट २०१७ ला रात्री ८ वाजून ३१ मिनिटांनी संपणार आहे. घरात, मंडळात किंवा मंदिरात श्रीगणेशाची मूर्ती आणण्याची वेळ सकाळी ७ वाजून ३८ मिनिटे ते ८ वाजून ३२ मिनिटांपर्यंत असेल. तर गणेश पूजनाचा शुभ मुहुर्त सकाळी ९ वाजून १५ मिनिटांपासून ते १० वाजून २८ मिनिटांपर्यंत असेल. आणि दुपारी १२.१६ ते ०१.१७ पर्यंत असेल. 

असे करा गणेश पूजन :

हिंदू शास्त्रांमध्ये श्रीगणेशाला सर्व दु:ख आणि अडचणींना दूर करणारा देव मानलं आहे. श्रीगणेशाची उपासना केल्याने शनिसहीत सर्व ग्रह दोष दूर होतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश पूजनासाठी सकाळी स्नान करून सर्वातआधी गणेशाची मूर्ती पूजेच्या ठिकाणी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे मुख करून लाल रंगाच्या आसनावर मूर्ती विराजमान करा. 

गणपतीला काय अर्पण करावे आणि करू नये :

त्यानंतर तुम्ही स्वच्छ आसनावर श्रीगणेशाच्या समोर बसा आणि श्रीगणेशाच्या नावाचा जप करत पुष्प, धूप, दीप, कापूर, लाल चंदन आणि मोदक अर्पण करा. हिंदू धर्मात भगवान गणेशाचे पूजन करताना तुळशीची पाने अर्पण करू नये. 

मोदक हा प्रिय प्रसाद :

भगवान गणेशाला मोदक अधिक अधिक प्रिय आहेत. त्यामुळे देशी तूपापासून तयार करण्यात आलेले मोदक त्यांना अर्पण करावे. पूजा करताना अजिबात संताप किंवा राग करू नये. हे तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी सर्वाधिक हानिकारक होऊ शकतं.