Shinde-Fadnavis government : शिंदे सरकारने आघाडीच्या नेत्याची सुरक्षा काढल्यानंतर आता राष्ट्रवादी आक्रमक

 महाविकास आघाडीमधील नेत्यांची सुरक्षा काढली यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आता आक्रमक झाली आहे. सुरक्षा काढून पक्षावर दबाव टाकत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.  

Updated: Oct 29, 2022, 12:01 PM IST
Shinde-Fadnavis government : शिंदे सरकारने आघाडीच्या नेत्याची सुरक्षा काढल्यानंतर आता राष्ट्रवादी आक्रमक  title=

Maha Vikas Aghadi leaders withdraw security​ : मुंबई : महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) नेत्यांची सुरक्षा काढली (Security cover) यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आता आक्रमक झाली आहे. सुरक्षा काढून पक्षावर दबाव टाकत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. सुरक्षा काढली म्हणून आम्ही घरी बसू, असा गोड गैरमसज शिंदे सरकारने करु नये अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे (NCP Spokesperson Mahesh Tapase) यांनी दिली आहे. उलट अधिक जोमाने शिंदे सरकारला विरोध करु तसेच शिर्डीला होणाऱ्या पक्षाच्या अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनिती बनवणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीच्या अनेक महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. (security of Mahavikas Aghadi leaders was withdrawn by the Shinde government) माजी मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यासारख्या नेत्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली. तर विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. पण आश्चर्याचा धक्का म्हणजे मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आली आहे. (Maharashtra: Security cover of MVA leaders withdrawn by Shinde-Fadnavis government)

मिलिंद नार्वेकर गेले काही दिवस ठाकरे गटावर नाराज असल्याची चर्चा आहे, त्यातच सरकारने सुरक्षा वाढवल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्यात. तर जितेंद्र आव्हाड यांचीही सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे. पवार आणि ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा कायम ठेवण्यात आली असून सध्या जेलमध्ये असलेल्या नवाब मलिक आणि संजय राऊतांची सुरक्षा काढण्यात आली आहे.