फडणवीस खोटा रिपोर्ट देऊन राज्याला बदनाम करतायत, राष्ट्रवादीचा पलटवार

 'फडणवीस खोटा रिपोर्ट देऊन राज्याला बदनाम करतायत'

Updated: Mar 23, 2021, 01:31 PM IST
फडणवीस खोटा रिपोर्ट देऊन राज्याला बदनाम करतायत, राष्ट्रवादीचा पलटवार title=

मुंबई : पोलीस बदल्यांची नियमावली माहित असताना फडणवीस (Devendra Fadnvis) खोटा रिपोर्ट देऊन राज्याला बदनाम करतायत असे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी म्हटले. महाविकास सरकार पाडण्यासाठी फडणवीसांचे हे खोटं षडयंत्र असल्याचे मलिक म्हणाले. ६ जीबी डाटा असो वा १०० जीबी असो..बेकायदेशीररीत्या फोन टॅप केले आहेत. हिम्मत असेल तर फडणवीसांनी डाटा देऊन दाखवा. त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो की नाही बघा. रश्मी शुक्लांनी (Rashmi Shukla) बेकायदेशीर फोन टॅप केले. त्यांचा अहवाल खोटा आहे. त्यांच्या अहवालातील नावं असलेल्या अधिकार्‍यांच्या बदल्याच झाल्या नाहीत. 

रश्मी शुक्ला कोणाचीही परवानगी न घेता लोकांचे फोन टॅप करत होत्या. याआधी देखील त्यांनी फोन टॅप केले आहेत. राज्यात सत्ता स्थापन होत असतानाही त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप केले होते. त्याकाळी भाजपच्या एजंट म्हणून त्या काम करत होत्या. बेकायदेशीरपणे फोन टॅप करण्याची त्यांना सवय झाली होती. 

बदल्यांमध्ये पैसे घेण्यात आले असे फडणवीस म्हणतात. पण थेट गृहमंत्री कुठल्याही बदल्या करत नाहीत. बदल्यांसाठी वरीष्ठ अधिकार्‍यांचे मंडळ असते ते बदल्या करत असते. या मंडळाची शिफारस झाल्यावर क्लास वन अधिकारी गृहमंत्र्यांचे मत नोंदवतात. मग मुख्यमंत्र्यांच्या मान्यता घेतली जाते. खालच्या अधिकार्‍यांच्या बदल्या साठी अधिकार्‍यांचे मंडळ २ असते. अहवालात बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. पण यातील अनेक बदल्या झाल्याच नाहीत. 

सत्ता गेल्यानंतर हे सरकार जाईल यासाठी तारखा देत होते. यांना सरकार पाडता आलं नाही त्यामुळे सरकारला बदनाम करण्याचं काम करतायत
केंद्रीय गृहसचिवा़कडे फडणवीस जाणार आहेत. याचा अर्थ त्यांना सरकार पाडता येत नाही त्यामुळे अधिकार्‍यांना हाताशी धरून सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. अधिकारी भाजपसाठी काम करत होते असेही मलिक यांनी म्हटले. 

सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दबाव टाकला होता असा दावा फडणवीसांनी केला. सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दबाव टाकला होता असा दावा फडणवीस यांनी केला होता, त्यासाठी राज्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल यांच्याकडे मत मागवल्याचे त्यांनी म्हटले होते, पण तसा कुठलाही कागद उपलब्ध नाही. त्यामुळे फडणवीस पहिल्या दिवसापासून खोटं बोलत आहेत असे मलिक म्हणाले.

परमबीर सिंह टीआरपी घोटाळ्याच्या मागे होते पण मागील दोन महिने ते याप्रकरणी शांत होते. कुठला दबाव होता त्यांच्यावर परमबिर सिंह यांनी आपल्या पत्रात डेलकर यांच्या आत्महत्येच्या गुन्ह्याचा उल्लेख केलाय. 
आत्महत्या मुंबईत झाली, गुन्हा नगर हवेलीला दाखल झाला पाहिजे असं ते म्हणत होते. भाजपच्या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी गृहमंत्री आपल्यावर मुंबईत गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव टाकत होते असं त्यांनी पत्रात म्हटलंय. गुन्हा जिथे घडतो तिथे तो दाखल होतो की नाही हे मला लोकांना विचारायचे आहे असे मलिक यांनी म्हटले.