कधी पावसात तर कधी रांगेत, शरद पवारांचा साधेपणा पुन्हा एकदा अधोरेखित

राजकारणातील उत्तुंग व्यक्तीमत्वाच्या साधेपणाचं आणखी एक उदाहरण 

Updated: Mar 29, 2022, 01:30 PM IST
कधी पावसात तर कधी रांगेत, शरद पवारांचा साधेपणा पुन्हा एकदा अधोरेखित title=

 मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सामाजिक जाणिवेचा आणि त्यांच्या दांडग्या राजकारणाचा अनुभव संपूर्ण महाराष्ट्राला आहे. एखादी व्यक्ती राजकारणात शिरली, यशस्वी झाला की तिच्या डोक्यात सत्तेची नशा चढते. मात्र, आकाशाला गवसणी घालूनही जमिनीशी नाळ जोडलेली व्यक्ती आताच्या परिस्थितीत दिसणं दुर्मिळच. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) आजही गावोगावी पायाला भिंगरी लागल्यागत फिरतात. तिथल्या कार्यकर्त्यांची नावं त्यांना तोंडपाठ असतात. पवार यांच्या साधेपणाचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. 

मुंबईच्या विमानतळावर आज शरद पवार राजकीय व्हीआयपी कल्चर बाजूला ठेवत सामान्य माणसाप्रमाणे वावरताना दिसले. मोठ्या आजारातून बाहेर पडत शरद पवार पुन्हा एकदा कार्यरत झाले आहेत. 

पण मुंबई विमानतळावरचं आजचं चित्र पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. व्हीआयपी असल्याचा फायदा घेण्याची राजकीय संस्कृती वाढत असताना शरद पवार यांनी मात्र सामान्य लोकांप्रमाणे रांगेत उभं राहत विमानात प्रवेश केला. 

आज सकाळी यूके ९७० मुंबई ते दिल्ली फ्लाईटच्या बोर्डिंगवेळी शरद पवार नावाच्या या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा हा साधेपणा अनेकांच्या मनाला भावून गेला. 

आज सकाळी शरद पवार मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी निघाले, मुंबई विमानतळावर पोहचात त्यांनी कुठचाही बडेजावपणा न दाखवता रांगेत उभं रहाणं पसंत केलं. मागेपुढे कोणताही लवाजमा नव्हता, तर चालताना काचेचा आधार घेत त्यांनी विमानात प्रवेश केला. यावेळचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.