मुख्यमंत्र्यांच्या सर्व पक्षीय खासदार बैठकीला नारायण राणे यांची दांडी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीला (all party MP meeting) नारायण राणे यांनी दांडी (Narayan Rane absent) मारली आहे.  

Updated: Jan 21, 2021, 01:19 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या सर्व पक्षीय खासदार बैठकीला नारायण राणे यांची दांडी  title=
संग्रहित छाया

मुबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीला (all party MP meeting) नारायण राणे यांनी दांडी (Narayan Rane absent) मारली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी खासदारांसोबत चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. मुख्यमंत्री ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील प्रश्न सोडविण्याबाबत आणि केंद्रीय अर्थसंल्पासंदर्भात ही बैठीक महत्वाची मानली जात आहे. या बैठकीकडे भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी पाठ फिरवली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यीतील सर्वपक्षीय खासदारांची बैठक बोलावली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी खासदारांसोबत चर्चा करण्यात येणार आहे. केंद्रात रखडलेल्या राज्यातील विषयांवर मंथनही करण्यात येणार आहे. या बैठकीलाशिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजपचे खासदारही उपस्थित आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी बोलावलेल्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांच्या बैठकीला भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे गैरहजर राहिले आहेत. नारायण राणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून संवाद साधणार आहेत. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहण्याचं टाळले आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीत औरंगबादच्या नामांतराचा विषय गाजण्याची शक्यता आहे. शिवसेना औरंगाबादचे नाव बदल्याण्यावरून आग्रही आहे. तसेच केंद्राकडे असलेला जीएसटी, मराठा आरक्षाणाचा मुद्दा आणि शेतकरी आंदोलन यावर चर्चा होणार आहे. औरंगाबादच्या नामांतरावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष आहे.

अर्णव गोस्वामी चॅट प्रकरणाचा मुद्दा शिवसेना बैठकीत उपस्थित करून यावर भाजप खासदारांची प्रतिक्रिया काय असेल, हे जाणून घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होते, याची उत्सुकता आहे.