मुंबईची ऑटोरिक्षा सुखसोईंनी सज्ज

छोटी झाडं ते अगदी वॉशबेसिंगपर्यंतच्या सुविधा 

Updated: Nov 22, 2019, 09:45 AM IST
मुंबईची ऑटोरिक्षा सुखसोईंनी सज्ज title=

मुंबई : काळी-पिवळी ऑटोरिक्षा ही मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य घटक. मुंबई उपनगरात रिक्षाचा सर्रास वापर केला जातो. कमी ठिकाणचं अंतर गाठण्यासाठी मुंबईकर रिक्षाचा वापर करतात. पण या प्रवासात जर तुम्हाला ऑटोरिक्षात अनेक सुखसोई मिळाल्या तर... अशीच काहीशी सोय मुंबईतील ऑटोरिक्षा चालक सत्यवान गिते यांनी केली आहे. 

सत्यवान गितेंच्या रिक्षात अनेक सुखसोई आहेत. वॉशबेसिंन, हँडवॉश, मोबाइल फोन चार्जर, छोडी झाडं आणि डेक्सटॉप मॉनेटर अशा सुविधांनी सज्ज सत्यवान गिते यांची ऑटोरिक्षा आहे. तसेच गिते यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी 1 किमीपर्यंतचा प्रवास हा मोफत ठेवला आहे. 

मुंबईतील पहिली होम सिस्टिम असलेली ऑटोरिक्षा (Mumbai's first home system autorickshaw) असून ही कॅप्शन त्यांच्या रिक्षावर आहे. तसेच गिते कोणकोणत्या सुविधा देत असल्याचं त्यांनी आपल्या रिक्षात लिहिलं आहे. 

एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, गितेंच्या रिक्षात कोणत्याही प्रकारच्या मोबाइलचं चार्जर उपलब्ध आहे. तसेच त्यांच्या रिक्षात पिण्याकरता प्युरिफाइड पाणी आणि वॉश बेसिंग आहे. ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन मिळत नाही. त्यामुळे गिते ज्येष्ठ नागरिकांना 1 किमीच प्रवास मोफत करून देतात. मुंबईतील प्रवाशांना रिक्षात चांगली सुविधा मिळावी याकरता गिते प्रयत्नशील असतात. गितेंच्या या रिक्षाने प्रवास करण्यासाठी सगळेच मुंबईकर उत्सुक आहेत.