मुंबई : गेल्या काही दिवसांपासून आपल्या दिवसाची सुरुवात ट्विटरवर शेरोशायरीतून करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजही 'स्वाभीमाना'ची माळ जपलीय. सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज तीनही पक्षांच्या आमदारांच्या बैठकांचा धडाका आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. सकाळी १०.३० वाजता शिवसेना आमदारांची मातोश्रीवर बैठक होणार आहे. मातोश्रीवर होणाऱ्या या बैठकीत शिवसेनेची सत्तास्थापनेची अधिकृत भूमिका स्पष्ट होणार आहे. या दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलंय.
'कभी कभी कुछ रिश्तों से बाहर आ जाना ही अच्छा होता है| अहंकार के लिये नही... स्वाभिमान के लिये' असं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 22, 2019
गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांच्या शेरोशायरीला त्यांच्याच अंदाजात उत्तर देणारे राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी आजही आपल्या ट्विटचा सिलसिला कायम ठेवलाय. उद्धव ठाकरे आणि पवार भेटीनंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एक ट्विट केलंय.
सच को में ने सच कहा, जब कह दिया तो कह दिया,
अब ज़माने की नज़र में ये हिमाकत है तो है।
जल्द बने गी महाराष्ट्र में जन के मन की सरकार ,
जय हिंद, जय महाराष्ट्र।
सच को में ने सच कहा, जब कह दिया तो कह दिया,
अब ज़माने की नज़र में ये हिमाकत है तो है। @rautsanjay61
जल्द बने गी महाराष्ट्र में जन के मन की सरकार ,
जय हिंद ,जय महाराष्ट्र । @NCPspeaks @ShivSena @INCMaharashtra— Nawab Malik (@nawabmalikncp) November 21, 2019
तसंच, 'अखेर भारतीय राजकारणाच्या तथाकथित चाणक्याला पवार साहेबांनी मात दिलीच... दिल्लीचं तख्त महाराष्ट्राला झुकवण्यात असमर्थ ठरलं, जय महाराष्ट्र!' असं म्हणत नवाब मलिक यांनी नाव न घेता अमित शाहांना काय टोला मारलाय
आख़िर भारतीय राजनीती के तथाकथित चाणक्य को @PawarSpeaks साहब ने मात दे ही दी ,
महाराष्ट्र को दिल्ली का तख्त नही झुका पाया,
जय महाराष्ट्र।— Nawab Malik (@nawabmalikncp) November 22, 2019
दरम्यान, गुरुवारी रात्री उशिरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची 'सिल्व्हर ओक'ला जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हेदेखील उपस्थित होते. ही भेट सकारात्मक झाल्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले.