वोक्स वॅगन कंपनीच्या दोन नव्या गाड्या बाजारात, पाहा नवा लूक

वाहन निर्मिती उद्योगात उदासीनतेचं वातावरण असताना दुसरीकडे वोक्स वॅगन कंपनीनं दोन नव्या प्रवासी कार बाजारात आणल्या आहेत.

Updated: Sep 5, 2019, 04:10 PM IST
वोक्स वॅगन कंपनीच्या दोन नव्या गाड्या बाजारात, पाहा नवा लूक title=

मुंबई : वाहन निर्मिती उद्योगात उदासीनतेचं वातावरण असताना दुसरीकडे वोक्स वॅगन कंपनीनं दोन नव्या प्रवासी कार बाजारात आणल्या आहेत. पोलो आणि वेंटो या दोन गाड्यांना स्पोर्ट्सलूक देण्यात आला आहे. पोलो आणि वेंटो या दोन्ही गाड्यांची किंमत सुमारे सहा लाख आणि नऊ लाख अशी आहे. 

त्यामुळे भारतीय ग्राहकांच्या या गाड्या पसंतीस पडतील असा विश्वास कंपनीचे संचालक स्टीफन कनप यांनी व्यक्त केलाय. दरम्यान यासंदर्भात संचालक स्टीफन कनप यांच्यासोबत अधिक बातचित केलीय आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी...

ग्राहकांचं समाधान, सुरक्षा, आणि गाडीचा लूक या गोष्टी लक्षात ठेऊन कार्स तयार करण्यात आल्या आहेत. तसेच अनेकांना आता वोक्स वॅगनची भुरळ पडणार आहे. कारण वोक्स वॅगन आता आर्थिक बाबतीत आवाक्यात येणारी कार असल्याचं सांगण्यात येत आहे.