मनसेच्या नितीन सरदेसाईंची 'ईडी'कडून चौकशी

मनसेचा आणखी एक नेता ईडीच्या फेऱ्यात

Updated: Sep 5, 2019, 03:43 PM IST
मनसेच्या नितीन सरदेसाईंची 'ईडी'कडून चौकशी title=

मुंबई: कोहिनूर स्क्वेअर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात राज ठाकरे यांच्यापाठोपाठ मनसेचा आणखी एक नेता सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) रडारवर आला आहे. ईडीने गुरूवारी मनसेचे माजी आमदार आणि राज ठाकरे यांच्या खास मर्जीतील नेते नितीन सरदेसाई यांना चौकशीसाठी पाचारण केले. नितीन सरदेसाई यांचा कोहिनूर स्क्वेअर कंपनीशी थेट संबंध नव्हता. मात्र, ते राज ठाकरे यांच्यासोबत मातोश्री रियल्टर्स या आणखी एका कंपनीत भागीदार आहेत. त्यामुळे 'ईडी'ने नितीन सरदेसाई यांना चौकशीसाठी बोलावल्याचे समजते. त्यानुसार सरदेसाई हे ईडीच्या कार्यालयात हजर झाले आहेत. 

काही दिवसांपूर्वीच 'ईडी'ने याच प्रकरणात राज ठाकरे यांची तब्बल नऊ तास चौकशी केली होती. तत्पूर्वी कोहिनूर स्क्वेअर कंपनीत राज यांचा भागीदार असलेल्या उन्मेष जोशी यांचीही 'ईडी'ने कसून चौकशी केली होती. 

'कोहिनूर' महागात! ईडी चौकशी करत असलेलं प्रकरण नेमकं आहे तरी काय?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राजेंद्र शिरोडकर आणि उन्मेश जोशी यांनी दादर येथील कोहिनूर मिलची जागा खरेदी केली. त्यासाठी आयएलएफएसकडून ८६० कोटी रूपयांचे कर्ज घेतले होते. यातील आयएल अँड एफएसने त्यांची भागिदारी विकल्याने कंपनीला १३५ कोटींचे नुकसान झाले. त्याचवेळी राज ठाकरे यांनी मातोश्री रियल्टर्स या आणखी एका कंपनीतील समभाग ८० कोटींना विकले. यामधून राज ठाकरेंना जवळपास २० कोटीचा फायदा झाला. जमिनीचे दर वाढल्यामुळे आपल्याला फायदा झाल्याचे राज यांनी ईडीच्या चौकशीत म्हटल्याचे समजते. 

एक्सक्लूझिव्ह रिपोर्ट : 'ईडी'कडून राज ठाकरेंची चौकशी नेमकी कशासाठी?