मुंबईतील गिर्यारोहकाचा नाशिक येथील गडावरुन पाय घसरुन मृत्यू

नाशिक येथे गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या मुंबईतील एका गिर्यारोहकचा आज पडून मृत्यू झाला. ही घटना सकाळी १०.३० वाजता घडल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 24, 2018, 10:46 PM IST
मुंबईतील गिर्यारोहकाचा नाशिक येथील गडावरुन पाय घसरुन मृत्यू title=

मुंबई : नाशिक येथे गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या मुंबईतील एका गिर्यारोहकचा आज पडून मृत्यू झाला. बोरिवली येथील २७ वर्षीय हेमेंद्र अधटराव याचा अचानकपणे पाय घसरल्याने तो २५० फूट दरीत कोसळला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला. ही घटना सकाळी १०.३० वाजता घडल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.

१४ जणांचा ग्रुप ट्रेकिंगसाठी 

हेमेंद्र हा बोरिवली येथील श्रीकृष्ण नगर येथे राहतो. त्याचा १४ जणांचा ग्रुप ट्रेकिंगसाठी नाशिक येथे गेला होता. गडगडसांगवी येथील किल्ल्यावर १४ जण ट्रेकिंगसाठी गेले होते.  शनिवारी सकाळी गिर्यारोहकांनी आमळी गडावर चढण्यास सुरुवात केली. ग्रुपमधील काही ट्रेकर्स गडाच्या निम्म्यावर असलेल्या देवी मंदिरात विश्रांतीसाठी थांबले. 

 गडावरील एक कडा सर करताना...

त्यानंतर आमळी गडावरील एक कडा सर करण्यासाठी जात असताना हेमेंद्र याचा अचानकपणे पाय घसरल्याने ते दरीत कोसळले. डोक्याला गंभीर मार लागल्याने हेमेंद्र यांचा मृत्यू झाला. हेमेंद्र हे पुण्यात  राहत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे.