नीरव मोदीच्या घरातील छाप्यात सापडला २६ कोटींचा ऐवज

नीरव मोदींच्या घरावर छापे टाकत 26 कोटी किंमतीचे दागिने, घड्याळं आणि चित्र जप्त करण्यात आलीय. 

Jaywant Patil Updated: Mar 24, 2018, 07:13 PM IST
नीरव मोदीच्या घरातील छाप्यात सापडला २६ कोटींचा ऐवज title=

मुंबई : पीएनबी भ्रष्टाचार प्रकरणी ईडीचं छापा सुत्र आहे. नीरव मोदींच्या घरावर छापे टाकत 26 कोटी किंमतीचे दागिने, घड्याळं आणि चित्र जप्त करण्यात आलीय. भारतात एकूण अडीचशेपेक्षा अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आलेत. या धाडसत्रात मोठे घबाड ईडीच्या हाती लागलंय. यात पुरातन काळातील मौल्यवान दागिने, महागडी घड्याळे, अम्रिता शेरगील आणि एम एफ हुसेन यांची महागडी अशी पेंटिंग असे 26 कोटी रुपयांची मालमत्ता मुंबईच्या घरातून जप्त करण्यात आलीय. 

घरातून मौल्यवान वस्तू जप्त

मुंबईच्या समुद्र महाल या आलिशान घरातून मौल्यवान वस्तू जप्त केल्यात. त्यात एक डायमंडची अंगठी जप्त केलीय. त्याची किमंत तब्बल 10 कोटी रुपये आहे. 

बारा हजार कोटींचा गैरव्यवहार

ही सर्व मालमत्ता सीबीआय आणि ईडी छापे मारत ताब्यात घेत असली तरी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीने बारा हजार कोटींचा गैरव्यवहार करून फरार झालेत. त्यांच्या अटकेसाठी आता जागतिक प्रयत्नही सुरु करण्यात आलेत तर त्याच्या कंपनीचे सहकारी आणि बॅंकेचे कर्मचारी सध्या जेलची हवा खात आहेत.