ठरलं! मुंबईत 'या' तारखेपासून शाळा सुरु होणार, पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं स्पष्ट

मुंबईत शाळा सुरु होण्याच्या तारखेवरुन विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता

Updated: Jan 20, 2022, 08:07 PM IST
ठरलं! मुंबईत 'या' तारखेपासून शाळा सुरु होणार, पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं स्पष्ट title=

मुंबई : Reopen school in Mumbai : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात सुरु करण्यात आलेल्या शाळा बंद करण्यात आल्या. मात्र, आता कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असल्याने शाळा सुरु (School Reopen) करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. सोमवारपासून राज्यातील शाळा सुरु होणार आहेत. शाळा सुरु करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांनी मंजुरी दिली आहे, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

त्यानंतर मुंबईतल्या शाळाही येत्या सोमवार म्हणजे २४ तारखेपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. शाळा सुरु करण्याबाबात राज्य सरकारने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने मुंबईत प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या शाळा सोमवार दिनांक २४ पासून कोविडच्या नियमांचं पालन करत सुरु होतील.

मास्क ठेवा आणि सुरक्षित रहा असं आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

शाळा सुरु करण्यातबाबत संभ्रम
मुंबईतली पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा सोमवार दिनांक २४ जानेवारीपासूनच सुरु होणार असल्याचं मुंबई पालिका (BMC) आयुक्त इक्बालसिंह (iqbal singh chahal) चहल यांनी स्पष्ट केलं आहे. पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी २७ तारखेपासून शाळा सुरु होणार असल्याची माहिती दिली होती. यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. पण पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनीही ट्विट करत २४ तारखेला शाळा सुरु होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

राज्यात स्थानिक प्रशासनाचा निर्णय
राज्यात स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरु होणार असल्याचं शालेयमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. राज्य सरकारच्या निर्णयानंतर 24 जानेवारीपासून शाळा सुरु होणार आहेत. जिथे रुग्णसंख्या कमी असेल तिथे शाळा सुरु होतील. पहिली ते बारावीचे सर्व वर्ग सुरु होणार आहे. शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे सरसकट शाळा सुरु होणार नसल्याचे संकेतही सरकारकडून देण्यात आले आहेत.