MRVC Job: मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत विविध पदांची भरती सुरु असून यासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 1 लाखाच्यावर पगार मिळू शकतो. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत प्रोजेक्ट इंजिनीअरच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून अथवा शिक्षणसंस्थेतून स्थापत्य इंजिनीअरिंगची पदवी 60टक्के गुणांसह पूर्ण केलेली असावी. किंवा त्या समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवारांकडे प्रोजेक्ट इंजिनीअर पदाचा 2 वर्षांचा अनुभव असावा.
प्रोजेक्ट इंजिनीअर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 ऑगस्ट 2023 पर्यंत 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. एससी/एसटी उमेदवारांना यात 5 वर्षांची सवलत तर ओबीसी उमेदवारांना यामध्ये 3 वर्षांपर्यंतची सवलत देण्यात येणार आहे. उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क किंवा परीक्षा फी घेतली जाणार नाही.
शासकीय कंत्राटी भर्तीचा GR निघाला; तब्बल 85 संवर्गातील रिक्त पदे भरणार
प्रोजेक्ट इंजिनीअर पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना अनुभवानुसार दरमहा 40 हजार रुपये ते 1 लाख 40 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना मुंबईत नोकरी करावी लागणार आहे. या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा होणार नाही. तर थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे. 25 ते 29 सप्टेंबर 2023 दरम्यान मुलाखती घेतल्या जाणार आहेत. उमेदवारांना मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड, दुसरा माळा, चर्चगेट स्टेशन बिल्डिंग, चर्चगेट. मुंबई -400020 या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.
पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
टाटा मेमोरियल सेंटरमध्ये दहावी ते पदवीधरांना नोकरी, 44 हजारपर्यंत मिळेल पगार
एमपीएससीअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाच्या एकूण 615 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई म्हणून निवड केली जाईल. 2 डिसेंबर 2023 उमेदवारांची पूर्व परीक्षा घेतली जाईल. यासाठी छ. संभाजीनगर, मुंबई, नागपूर, पुणे, नांदेड, अमरावती आणि नाशिक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असेल याची उमेदवारांनी नोंद घ्या. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांना 11 सप्टेंबर 2023 पासून अर्ज करता येणार आहे. तर 3 ऑक्टोबर 2023 ही अर्जाची शेवटची तारीख आहे.