गणेशोत्सवाच्या काही महिन्यांपूर्वीच मंडळांसाठी महत्त्वाच्या सूचना; आता चार दिवस...

BMC Advisory for Ganeshotsvan 2024: यंदाच्या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी सध्या बरेच दिवस शिल्लक असले तरीही काही मंडळांपासून अनेक कुटुंबांपर्यंत बऱ्याचजणांनी या उत्सवाची थोडीथोडकी तयारी सुरु केली आहे.

सायली पाटील | Updated: Feb 16, 2024, 12:03 PM IST
गणेशोत्सवाच्या काही महिन्यांपूर्वीच मंडळांसाठी महत्त्वाच्या सूचना; आता चार दिवस... title=
Mumbai news ganeshotsav 2024 bmc issues loud speaker advisory

BMC Advisory for Ganeshotsvan 2024:  गणेशोत्सव (Ganeshotsav) म्हटलं की मुंबईचं वेगळं रुप पाहायला मिळतं. एरव्ही घड्याळाच्या काट्यावर चालणारं हे शहर गणेशोत्सवादरम्यान मात्र नव्या उत्साहात सर्वांच्या स्वागतासाठी सज्ज असतं. अशा या गणेशोत्सवाचा उत्साह यंदाची कायम असून, वर्षाच्या सुरुवातीपासूनच काही मंडळांनी बाप्पासाठीची सजावट, मूर्तीचं रुप या आणि अशा अनेक गोष्टींची तयारी केली आहे. असं असतानाच  प्रशासनानं या उत्सवाच्या निमित्तानं काही खास सूचना फार आधीच जारी केल्या आहेत. 

गणेशोत्सवाचे 10 किंवा 12 दिवस मंडळं आणि घराघरांमध्ये लाऊडस्पीकरचा सर्रास वापर केला जातो. गणरायाची गाणी असो किंवा मग मिरवणुका आणि मंडळातील कार्यक्रमांसाठी होणारा त्यांचा वापर असो. अनेकदा अनावधानानं या ध्वनीक्षेपकांचा वापर होत असताना आवाडाची मर्यादा ओलांडली जाते. पण, तसं होऊ नये यासाठी आतापासूनच यंत्रणांकडून सूचना देण्यात आल्या आहेत. 

गणेशोत्सव 2024 मध्ये चार दिवस मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर्सचा वापर करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. सहसा नियमांनुसार वर्षभरातील 15 दिवस सकाळी 6 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यत लाऊडस्पीकरच्या वापरास परवानगी देण्यात येते. अशा दिवसांपैरी 13 दिवसांची यादी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं जारी करण्यात आली आहे. यामध्ये गणेशोत्सवातील चार दिवसांचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. 

कधी आहे यंदाचा गणेशोत्सव? 

यंदाच्या वर्षी 7 सप्टेंबर 2024 पासून गणेशोत्सव सुरु होणार असून, 12 सप्टेंबर रोजी गौरी - गणपती विसर्जन आहे. तर, 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. 

 

हेसुद्धा वाचा : IndiGo flight: बॉम्बची धमकी कोणी दिली? टिश्यूपेपरवरील अक्षर पाहून सूत्र चाळवताच समोर आली अनपेक्षित माहिती

 

मागच्या वर्षी गणेशोत्सवादरम्यान शेवटच्या तीन दिवसांसाठी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकरचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली होती. या निर्णयानंतर अनेक गणेशोत्सव मंडळांनी नाराजी व्यक्त केली होती. यंदाचं वर्ष मात्र हिरमोड करण्याचं नसणार आहे हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे, कारण मंडळांना गणेशोत्सवातील चार दिवस मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वापरता येणार आहेत. 

नियम काय सांगतो? 

लाऊडस्पीकरच्या वापरासंदर्भातही प्रशासनानं काही नियम आखले असून, यामध्ये काही कायदेशीर तरतुदीसुद्धा आढळतात. सभागृह, सामूहिक सभागृहं आणि कार्यक्रम स्थळं यांसारख्या बंदिस्त जागा वगळून इतर ठिकाणी लाऊडस्पीकरचा वापर करता येतो. ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 अन्वये बंद जागांखेरीज अन्य ठिकाणी सांस्कृतिक किंवा धार्मिक कार्यक्रम आणि ठराविक दिवसांना  सकाळी 6 वाजल्यापासून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकरचा वापर करण्याची परवानगी आहे.