Mumbai News : जूनपर्यंत बदलणार कोस्टल रोडचा चेहरामोहरा; नवे बदल तुम्हाला कितपत फायद्याचे?

Mumbai News : मुंबईकरांच्या सेवेत असणाऱ्या कोस्टल रोडवरील प्रवासात जून महिन्यापर्यंत बदल होणार असून, इथून पुढं प्रवास होणार आणखी सुकर.   

सायली पाटील | Updated: Apr 23, 2024, 08:46 AM IST
Mumbai News : जूनपर्यंत बदलणार कोस्टल रोडचा चेहरामोहरा; नवे बदल तुम्हाला कितपत फायद्याचे?  title=
Mumbai news coastal road more than 4 lakh vehicles travelled june onwards new changes will be added to journey

Mumbai News : मुंबईच्या प्रवासमार्गांमध्ये मागील काही वर्षांत सातत्यानं झालेल्या बदलांमुळं शहरातील वाहतुकीला आधुनिकीकरणाची जोड मिळाल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. अशक्य वाटणारे रस्तेही आता जोडण्यात आल्यामुळं शहराचा मुख्य भाग आणि उपनगरंही जवळ आली आहेत. यामध्ये सध्या महत्त्वाच्या भूमिकेत असणारा शहरातील एक रस्ता म्हणजे, कोस्टल रोड अर्थात सागरी किनारा मार्ग. 

लोकार्पण झाल्या दिवसापासून या मार्गावरून महिन्याभरात जवळपास सव्वादोन लाखांहून अधिक वाहनांनी प्रवास केला. वाहनांचा सरासरी आकडा घ्यायचा झाल्यास दर दिवशी या मार्गावरून 19500 वाहनं प्रवास करतात. अशा या शहरातील मुख्य भागांना जोडणाऱ्या कोस्टल रोडवरून येत्या काळात एका दिवसात 90 हजार किंवा त्याहून अधिक वाहनंही धावू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

एक बदल ठरणार कारणीभूत 

धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता म्हणजेच कोस्टल रोडवर सध्या फक्त एकाच बाजुची वाहतूक सुरु असून वाहनांना मरिन ड्राईव्ह ते वरळी असा प्रवास करता येत आहे. पण, सी लिंक (Bandra Worli Sea Link) कडील दक्षिण टोकापर्यंचा प्रवास जूनपपर्यंत सुरु होणार असल्यांमुळं कोस्टल रोडचा नवा चेहरामोहरा शरातीस वाहतुक व्यवस्था पुन्हा बदलणार आहे. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : विदर्भात गारपीट तर, राज्याच्या 'या' भागात वीजांटच्या कडकडाटासह पाऊस; तुमच्या शहरात काय परिस्थिती? 

कोस्टल रोडचा पुढील टप्पा आणि त्यानंतर सर्व इंटरचेंज सुरु झाल्यानंतर इथून ये-जा करणाऱ्या वाहनांच्या आकड्यात लक्षणीय वाढ होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलं. 

सध्याच्या घडीला सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास या मार्गानं प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या सर्वाधिक असते. साधारण 12 वाजेपर्यंत इथून जाणाऱ्या वाहनांचा आकडा मोठा असतो. यानंतर दुपारी तीन ते चार या वेळेतही वाहनांची संख्या जास्त असते. सध्या कोस्टल रोडवर वरळीतील बिंदू माधव ठाकरे चौक, रजनी पटेल चौक आणि भुलाबाई देसाई रोडवरून प्रवेश करता येतो. तर, अमरसन्स गार्डन, भुलाबाई देसाई रोड आणि मरीन ड्राईव्ह येथून या कोस्टल रोडला Exit अर्थात बाहेर पडण्यासाठी नाट देण्यात आली आहे.