मुंबई : बातमी समृद्धी महामार्गासंदर्भातील आहे. मुंबई-नागपूर 701 किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या चारचाकी गाड्यांना जवळपास 1200 रुपये टोल भरावा लागणार आहे. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लवकरच लोकार्पण केलं जाणार आहे. त्यानंतर मुंबई ते नागपूर हे 701 किलोमीटरचं अंतर वेगानं पार करता येईल. मात्र या महामार्गावर वाहनांना नेमका किती टोल भरावा लागणार यासंदर्भात अधिकृत आकडेवारी समोर आलीय. (mumbai nagpur superfast expressway 4 wheelers will have to pay around Rs 1200 toll)
समृद्धी महामार्गाच्या टोलची माहिती देणारा बोर्ड महामार्गाच्या कडेला लावण्यात आला आहे. त्या बोर्डवर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नेमका किती टोल भरावा लागणार, यासंदर्भातली माहिती देण्यात आली आहे. टोलचे दर 31 मार्च 2025 पर्यंत अर्थात पुढील 3 वर्षांसाठी लागू असतील, असंही या बोर्डवर नमूद करण्यात आलंय. महामार्गावर प्रवास करणाऱ्या चारचाकी गाड्यांसाठी प्रतिकिलोमीटर 1.73 रुपये टोलची वसुली करण्यात येणार आहे.
मुंबई पुणे एक्प्रेस वेवरील प्रवासही आता महागणार आहे. मुंबई पुणे एक्प्रेस वे मार्गावरच्या टोलमध्ये (Toll) तब्बल 18 टक्के वाढ होणार आहे. 1 एप्रिल 2023 पासून ही वाढ होणार आहे. त्यामुळे आता मुंबई पुणे एक्प्रेस वेवरून (Mumbai–Pune Expressway) प्रवास करणाऱ्यांना जास्त टोल भरावा लागणार आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस वे च्या टोलमध्ये दर तीन वर्षांनी 18 टक्के वाढ करण्यात येईल अशी सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने (MSRDC) 2004 मध्ये काढली होती. त्यानंतर ही टोल वाढ करण्यात येत आहे.
याआधी 1 एप्रिल 2020 रोजी टोलमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुढील वर्षी 1 एप्रिलपासून टोलचे दर वाढणार आहेत. मात्र 1 एप्रिल 2023 पासून लागू होणारे टोलचे दर 2030 पर्यंत कायम राहणार आहेत असेही सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितलं आहे.