Mumbai Local Train Mega Block : मुंबईत प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. ( Mumbai News ) रविवारी सुट्टीचा मूड असल्याने अनेक जण मुंबईत फिरण्याचा बेत करतात. ( Local Train Mega Block) ते प्रवासासाठी लोकलला प्राधान्य देत असतात. मात्र, रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक (Mumbai Mega Block) आहे. कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक आहे, हे तुम्ही जाणून न घेता प्रवास करणार असाल तर तुम्ही मध्येच लटकाल. त्यामुळे कुठे मेगाब्लॉक आहे ते जाणून घ्या आणि घराबाहेर पडा. (Mumbai Local Mega Block )
मुंबईत लोकलच्या अभियंत्रिकी कामासाठी तसेच सिग्नल कामासाठी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉग घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
माटुंगा - मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.5 ते दुपारी 3.55 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गाने वळवण्यात येतील आणि त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसारच्या स्थानकांवर थांबतील. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने धावतील.
ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील त्यांच्या वेळापत्रकानुसारच्या स्थानकांवर थांबतील आणि माटुंगा येथे अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने धावतील.
वडाळा रोड-मानखुर्द अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.00 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - वांद्रे/गोरेगाव सेवा प्रभावित होणार नाही) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.03 ते दुपारी 3.54 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी करीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.40 ते दुपारी 3.28 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहे.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि वांद्रे आणि गोरेगाव दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार सुरु राहिल. तर हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10.00 ते सायंकाळी 4.30 पर्यंत ट्रान्सहार्बर/मेन लाइनवरुन प्रवास करण्याची परवानगी असणार आहे. तसेच ब्लॉक कालावधीत पनवेल - मानखुर्द मार्गावर विशेष उपनगरीय गाड्या चालविण्यात येणार आहेत.