Mumbai Local News : मुंबईकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असणाऱ्या रेल्वे विभागाकडून अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नोकरदारांच्या दृष्टीनं ही अतिशय महत्त्वाची बातमी ठरत असून, त्यांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे. कारण, मध्य रेल्वेनं हा निर्णय घेत नोकरदारांना दिलासा दिला आहे.
रेल्वेच्या निर्णयानंतर आता CSMT अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे 4.35 वाजता पहिली फास्ट लोकल सुटणार आहे. गुरुवारपासूनच या निर्णयाची अंमलबजावणीही होणार आहे. याआधी पहिली फास्ट लोकल पहाटे 5.20 मिनिटांनी होती. आता मात्र ही लोकल जवळपास 40 - 45 मिनिटं आधीच सुणार असून, ही लोकल सीएसएमटीहून खोपोलीपर्यंतच्या मार्गावर चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे.
लोकलच्या वेळापत्रानुसार ‘सीएसएमटी’हून सकाळी 4.19 वाजता लोकल वाहतूक सुरू होते. पहिली कसारा लोकल 4.19 वाजत. तर, पहिली जलद लोकल कल्याणसाठी 5.20 जता निघते. मात्र, ही AC लोकल असल्यामुळं साध्या जलद लोकलसाठी सर्वसामान्यांना 5.46 च्या कर्जत जलद लोकलची वाट पाहावी लागते. यामुळे लोकल सुरू झाल्यानंतर तब्बल दीड तास प्रवाशांना जलद लोकलसाठी वाट पाहावी लागते. आता मात्र हे चित्र बदलणार हे खरं.
दरम्यान, पहाटेची पहिली जलद लोकल भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण या स्थानकावर थांबणार आहे. कल्याण ते खोपोलीदरम्यान ही लोकल सर्व स्थानकांवर थांबेल. या जलद लोकलमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.
CSMT-Khopoli KP-1(96003) local-
Earlier running as Slow local, from 10/8/23 will run as Fast local
A)Earlier timing
CSMT-4.24 hrs
Kalyan-5.51 hrs/5.53 hrsB)New timing
CSMT-4.35 hrs
BY-4.42 hr
DR-4.48 hrs
CLA-4.57 hrs
GC5.02 hrs
TNA-5.20 hrs
DI-5.37 hrs
KYN-5.51 hrs/5.53 hrs pic.twitter.com/kqT6kbJTi9— Central Railway (@Central_Railway) August 8, 2023
तिथं प्रवाशांच्या सुविधांसाठी रेल्वे विभाग महत्त्वाचे निर्णय घेत असतानाच इथं बुधवारी दिवा रेल्वे स्थानकात पहाटे प्रवाशांचं आंदोलन पाहायला मिळालं. सकाळी 6.25 वाजता सीएसएमटीला जाणारी फास्ट लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक 4 ऐवजी 2 वर आल्यानं प्रवासी संतप्त झाले. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी 10 मिनिटांहून अधिक काळ लोकल थांबवून ठेवली होती. अखेर रेल्वे प्रशासनानं समजूत काढल्यानंतर लोकल रवाना झाली. दरम्यान काही वेळाच्या या गोंधळानंतर लोकलसेवा सुरळीत झाली.