Mumbai Crime : नाकाबंदीदरम्यान (nakabandi) एका पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर गाडी घातल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एकाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. कांजूरमार्ग (पूर्व) येथे शनिवारी पहाटे नाकाबंदीच्या कर्तव्यावर असलेल्या पार्कसाइट पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकांना भरधाव कारने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. वीरेंद्र खवळे असे जखमी पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. वीरेंद्र खवळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. याप्रकरणात आरोपी चालक विशाल घोरपडे याला असून पार्कसाईट पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
फोर्टिस रुग्णालयात जखमी उपनिरीक्षक वीरेंद्र खवले (56) यांच्यावर उपचार सुरू असलेल्या डॉक्टरांनी सांगितले की, त्यांच्या खांद्यापर्यंतच्या मनगटाचे हाड खराब झाल्याने एक हात कापावा लागणार आहे. "पार्कसाइट पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक वीरेंद्र खवले हे दारू पिऊन गाडी चालवण्याला आळा घालण्यासाठी नाकाबंदी कर्तव्यावर असताना जखमी झाले. विशाल घोरपडेला थांबण्यास सांगितले होते पण त्याने खवळे यांना धडक दिली आणि चेक पॉईंट पार केला," अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
पोलीस निरीक्षक वीरेंद्र खवळे हे शनिवारी पहाटे कांजूरमार्ग येथील हुमा मॉल परिसरात नाकाबंदीदरम्यान कर्तव्यावर होते. त्यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये असलेल्या विनोद घोरपडेला थांबण्याचा इशारा केला. मात्र, घोरपडेने वेगाने कार चालवत खवळे यांना धडक दिली आणि पळ काढला. धडकेमुळे जखमी झालेल्या खवळे यांना फोर्टिज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, खवले यांना कारला धडक दिल्यानंतर आरोपी पळून गेला आणि भांडुपजवळ गस्ती पथकाने त्याला ताब्यात घेतले. पोलिसांना त्याचा 3 किमीपर्यंत पाठलाग करावा लागला. पार्कसाईट पोलिसांनी कार चालक विशाल घोरपडे याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, बेदरकारपणे गाडी चालवण्याचा प्रयत्न या कलमांखाली अटक केली आहे. मद्यपान करून वाहन चालवणे आणि मोटार वाहन कायद्याची कलमे जोडणार आहेत अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे. कारण आरोपीच्या रक्त तपासणी अहवालात उच्च पातळीचे मद्य असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सात ते आठ पोलिसांसह एलबीएस मार्गावरील हुमा चित्रपटगृहाजवळ विशेष पोलीस नाकाबंदी केली होती. त्यावेळी जखमी उपनिरीक्षक नाकाबंदीच्या ड्युटीवर होते.
"पहाटे दोनच्या भांडुप येथून भरधाव वेगात असलेली कार इशाऱ्यानंतरही थांबली नाही आणि तिने बॅरिकेड्सला धडक दिली.. पोलिसांनी गाडीचा वेग कमी सांगायला सांगितला होता, पण कार चालकाने पकडले जाण्याच्या भीतीने वेगाने गाडी चालवली आणि पोलीस अधिकाऱ्याला धडक दिली. या धडकेत खवले जखमी झाले," असे पार्कसाईट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक असे विनायक मेहेर यांनी सांगितले.