WiFi चा पासवर्ड न सांगणं अल्पवयीन मुलाच्या बेतलं जीवावर, मुंबईतील हादरवणारी घटना

मोबाईलवर व्हिडिओ बघता यावेत यासाठी आरोपींनी त्या मुलाकडे WiFiचा पासवर्ड मागितला पण...  

Updated: Nov 1, 2022, 11:56 PM IST
WiFi चा पासवर्ड न सांगणं अल्पवयीन मुलाच्या बेतलं जीवावर, मुंबईतील हादरवणारी घटना title=

मुंबई : मुंबईतून (Mumbai) एक हादरवणारी घटना समोर आली आहे. दोन तरुणांनी एका अल्पवयीन मुलाची हत्या केली. त्या मुलाचा गुन्हा केवळ इतकाच होता की त्याने या तरुणांना WiFi चा पासवर्ड (Password) दिला नाही. पनवेलमध्ये (Panvel) ही धक्कादायक घटना घडली आहे. संतापलेल्या तरुणांनी या अल्पवयीन मुलाला मारहाण केली आणि त्यानंतर चाकूने त्याची हत्या केली.

नेमकी घटना काय?
नवी मुंबईतल्या (Navi Mumbai) पनवेल इथल्या सेक्टर 14 मध्ये ही घटना घडली. इथल्या एका सोसायटीत दोन तरुण काम करत होते. रविंद्र अटवाल उर्फ हरियाणवी आणि संतोष वाल्मिक अशी आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविंद्र, संतोष आणि मृत मुलगा शुक्रवारी रात्री एका टपरीवर गेले होते. तिथे रविंद्र आणि संतोषने त्या मुलाकडे पासवर्ड मागितला. पण त्या मुलाने तो देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापल्या रविंद्र आणि संतोषने त्या मुलाला शिविगाळ करण्यास सुरुवात केली. यावर त्या मुलानेही शिविगाळ केली. त्यामुळे संतापलेल्या रविंद्र आणि संतोषने त्या मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली.

प्रकरण इतकं वाढलं की रविंद्रने खिशातला चाकू काढून तो अल्पवयीन मुलाच्या पोटात भोसकला. यात तो मुलगा गंभीर जखमी झाला. हल्ला केल्यानंतर आरोपी रविंद्र आणि संतोष घटनास्थळावरुन फरार झाले. आसपासच्या लोकांनी गंभीर जखमी झालेल्या मुलाला रुग्णालयात दाखल केलं. पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. 

पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी रविंद्र आणि संतोषला अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.