मुंबई : मायानगरी मुंबईवर आज कचऱ्याचं साम्रज्य पसरलंय. गेल्या चार दिवसांपासून पश्चिम उपनगरात सुरू असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज साऱ्या मुंबईतल्या सफाई कामगारांनी कामबंद आंदोलन केलंय. यामुळे मुंबईकरांना आज दिवसभर तरी कचऱ्याच्या समस्येला सामोर जाव लागणार आहे. आपल्या विविध मागण्या वारंवार निवेदन, अर्ज करुनही पूर्ण न झाल्याने आता सफाई कर्मचाऱ्यांनीही बंडाचा झेंडा उगारलाय.
पश्चिम उपनगरातील तीन विभागातून या कामबंद आंदोलनाला सुरूवात झाली. हळूहळू या आंदोलनाला इतर विभागातूनही पाठिंबा मिळतोय.
या विभागाने सुरू असलेल्या सफाई कर्मचा-यांच्याआंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी २४ विभागातील कर्मचारी कामबंद आंदोलन करत आहेत.
कचरा गोळा करण्याचंही कंत्राटीकरण करून विभागातील कर्मचा-यांना दुस-या विभागात बदली केली होती. त्यामुळं हे आंदोलन सुरू झाले होते.
शहरातील आज कचरा उचलला जाणार नाही. मुंबईमध्ये याचा परिणाम आज जाणवणार आहे.
योग्य कचरा व्यवस्थापन न झाल्याने नागरिकांच्या तक्रारीही आज वाढण्याची शक्यता आहे.