मुंबई : कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना काही दिवस लालबाग उड्डाण पुलावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. भायखळा येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामानिमित्त भायखळा उड्डाण पुलाखालून वाहतूक बंद करण्यात आली आहे. परिणामी त्याठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून वाहनकाच्या रांगा या लालबाग उड्डाण पुलापर्यंत आल्याचं पाहायला मिळतंय. वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत असले तरी मुंबईकरांनी रस्ते मार्गाने जात असल्यास थोडे लवकरच घराबाहेर पडून इच्छितस्थळी वेळेवर पोहोचावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अखत्यारीतील सायन उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम २० एप्रिल २०१९ पासून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे साधारणत: दोन महिन्याच्या कालावधीसाठी उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. सायन उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट आयआयटी मुंबईमार्फत करण्यात आले होते. त्यांच्या अहवालानंतर या पुलाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. बेअरिंग बदलण्यात येणार असल्याने तोपर्यंत खबरदारांची उपाययोजना म्हणून उड्डाणपुलावरील जड वाहनांची वाहतूक बंद करण्याबाबत वाहतूक पोलिसांना कळविण्यात आले आहे.