मुंबई : कोस्टल रोडवरुन आता शिवसेना आणि भाजप यांच्यात वाद उफाळण्याची शक्यता आहे. या कोस्टल रोडचे श्रेय घेण्यासाठी आता चढाओढ पाहायला मिळत आहे. मुंबई भाजपने शिवसेना भवनसमोर कोस्टल रोडचे श्रेय घेणारी होर्डींग्स लावली आहेत. दरम्यान, कोस्टल रोड भूमिपूजन कार्यक्रम सोहळ्याच्या मुंबई महापालिका आमंत्रण पत्रिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव नाही. त्यामुळे वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
नरिमन पॉईंट ते कांदिवली. समुद्र किनाऱ्याला लागून जाणाऱ्या या रस्त्यानं आता पश्चिम उपनगरं जोडली जाणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून खरंतरं कोस्टल रोडची संकल्पना विधानसभेच्या रणधूमाळीत पुढे आणली. मुंबई पालिकेच्या बजेटमध्ये कोस्टल रोडसाठी तरतूदही केली. पण आज काहीतरी वेगळचं पुढे आलंय. कोस्टल रोडच्या भूमीपूजनावरून शिवसेना-भाजपत श्रेय वादाची लढाई दिसून येत आहे. भाजप आमदार आणि मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेना भवनसमोरच श्रेय घेणारी होर्डींग्स लावली आहेत. कोस्टल रोडमुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार आहे. काँग्रेसने मुंबईकरांच्या तोंडाला पानं पुसली. त्यांनी फक्त स्वप्न दाखवले, अशी काँग्रेसवर टीका केली.
भाजपने जे केल तेच आम्ही जनतेसमोर मांडत आहोत. केवळ अडीच वर्षांच्या काळात केंद्रापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत 19 परवानग्या मिळवण्याच काम नरेंद्र मोदींजींच्या सरकारने केले. म्हणूनच कोस्टल रोड चे स्वप्न पूर्ण होईल, असं दिसतंय. भारतीय जनता पार्टीने मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच अभिनंदन केले आहे. जनतेसमोर ही माहिती ठेवली आहे. इतक्या जलद परवानग्या दिल्याबद्दल मोदी यांचे आभार मुख्यमंत्र्यांनी हे काम पूर्णपणे घडवून आणल्याबद्दल त्यांचे अभिनंदन, अशा आशयाची होर्डींग्स लावली आमदार आशिष शेलार यांनी लावलीत.