होणाऱ्या सुनेसह बाप्पाच्या चरणी अंबानी कुटुंब

गोव्यामध्ये झालेल्या प्री एंगेजमेंट सेरेमनीनंतर अंबानी कुटुंबाने होणाऱी सून श्लोका मेहतासह मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायकाचे दर्शन घेतलेय.

Updated: Mar 26, 2018, 11:49 AM IST
होणाऱ्या सुनेसह बाप्पाच्या चरणी अंबानी कुटुंब title=

मुंबई : गोव्यामध्ये झालेल्या प्री एंगेजमेंट सेरेमनीनंतर अंबानी कुटुंबाने होणाऱी सून श्लोका मेहतासह मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायकाचे दर्शन घेतलेय.

Akash Ambani and Shloka Mehta Siddhivinayak Temple

यावेळी पहिल्यांदा मुकेश अंबानीसह संपूर्ण कुटुंब होणाऱ्या सुनेसह मीडियासमोर आले. मंदिरात दर्शन घेण्यासाठी श्लोका अंबानी कुटुंबासह आली होती. 

Akash Ambani and Shloka Mehta Siddhivinayak Temple

याआधी या दोघांच्या नात्यावरुन दोन्ही कुटुंबाकडून कोणतेही विधान करण्यात आले नव्हते. मात्र प्री एंगेजमेंटचे फोटो समोर आल्यानंतर दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झालेय.

Akash Ambani and Shloka Mehta Siddhivinayak Temple

सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेण्यासाठी आकाश अंबानी, श्लोका मेहता, मुकेश अंबानी आणि नीता अंबानीसह अनंत अंबानी आणि ईशा अंबानीही होते. 

Akash Ambani and Shloka Mehta Siddhivinayak Temple

मंदिरात दर्शन घेतल्यानंतर नीता अंबानी आपल्या सुनेचा हात पकडून चालतना दिसली. असंही म्हटलं जातय की आकाश आणि श्लोका मेहताचा जूनमध्ये साखरपुडा होणार.

Akash Ambani and Shloka Mehta Siddhivinayak Temple

तर याच वर्षी डिसेंबरमध्ये दोघंही लग्न करतील. नुकतीच गोव्यामध्ये प्री एंगेजमेंट सेरेमनी ठेवण्यात आली होती. यादरम्यान अंबानीने श्लोकाला प्रपोज करताना तिला हिऱ्याची अंगठी घातली. 

Akash Ambani and Shloka Mehta Siddhivinayak Temple